AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Murder : बिहारमध्ये डबल मर्डर, पती-पत्नीच्या संशयास्पद हत्येने खळबळ

पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली आणि कुणी केली ? याचा तपास पोलिस करीत आहेत.

Bihar Murder : बिहारमध्ये डबल मर्डर, पती-पत्नीच्या संशयास्पद हत्येने खळबळ
संपत्तीच्या वादातून काकांनीच पुतण्याला 11 वेळा भोसकलेImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 5:22 PM
Share

मधेपुरा : मधेपुरा सदर उपविभागातील गमहरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदर पंचायत प्रभाग क्रमांक 1 मध्ये रविवारी सकाळी डबल मर्डर (Double Murder)ची घटना उघडकीस आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पती-पत्नी (Husband-Wife)चे मृतदेह आढळून आले. एकाच दिवसात दोन मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीचा मृतदेह घरात पलंगाखाली आढळून आला, तर घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये पतीचा मृतदेह एका कालव्यात आढळून आला. मयत जोडप्याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले असून महिला सात महिन्यांची गरोदर होती. दरम्यान, दोघांची हत्या का आणि कशी झाली ? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. (Husband and wife murdered in Bihar for unknown reasons police begin investigation)

हत्येचे कारण अस्पष्ट

वंदना कुमारी असे मयत महिलेचे नाव असून विकास रॉय उर्फ ​​बिक्कू असे तिच्या पतीचे नाव आहे. घटनेच्या वेळी पती-पत्नीशिवाय घरी कुणीही नव्हते, असे शेजाऱ्यांनी सांगितले. मयत महिलेची सासू तीन दिवसांपूर्वी माहेरी गेली होती, तर मोठा दीर नोकरीनिमित्त बाहेरगावी गेला असून त्याचे कुटुंबही गावात नव्हते. घटनेची माहिती मिळताच गमहरिया पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ज्या ठिकाणी पतीचा मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणी गवत तुडवले गेले होते. त्यामुळे मृतदेह ओढून नेल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली आणि कुणी केली ? याचा तपास पोलिस करीत आहेत. महिलेच्या नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करत घटनेचा तपास सुरु केला आहे. (Husband and wife murdered in Bihar for unknown reasons police begin investigation)

इतर बातम्या

Pune crime : भाड्यानं घर पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा बलात्कार; रिअल इस्टेट एजंटला पुण्याच्या विमानतळ पोलिसांनी केली अटक

UP Murder : उत्तर प्रदेशात संपत्तीच्या वादातून मुलाकडून पित्याची हत्या, आरोपी फरार

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.