पुराच्या पाण्याचा फटका, तडे गेल्यामुळे कल्याण-गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद, पाहणी केल्यानंतरच पुढील निर्णय

पुराच्या पाण्यामुळे कल्याण-गांधारी पुलाला तडे गेले आहेत. याच कारणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

पुराच्या पाण्याचा फटका, तडे गेल्यामुळे कल्याण-गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद, पाहणी केल्यानंतरच पुढील निर्णय
KALYAN BRIDGE
अमजद खान

| Edited By: चेतन पाटील

Jul 27, 2021 | 10:36 AM

ठाणे : पुराच्या पाण्यामुळे कल्याण-गांधारी पुलाला तडे गेले आहेत. याच कारणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या पुलावरील सर्व वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवली आहे. तसेच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी सुरु करायचा की नाही, याबबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. (Kalyan Gandhari bridge broken due flood bridge is been closed as precautionary measure)

पाऊस आणि पुरामुळे कल्याण-गांधारी पुलाला तडे

मागील काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानीबरोबरच रस्ते, पूल उखळून पडले आहेत. याच पाऊस आणि पुरामुळे कल्याण-गांधारी पुलाची नासधूस झाली आहे. पुरामुळे पुलाच्या पिलरला तडे गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. बंद करण्यात आलेल्या या पुलाचा वापर भिवंडी, पडघ्याच्या दिशेने जाण्यासाठी होतो.

पुलावरील वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवण्यात आली

कल्याण-गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे या भागात वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे चाकरमान्यांना त्यांच्या घरी जाण्यास उशीर होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेता सुरक्षिततेसाठी पुलावरील वाहतूक बंद करत या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पीडब्ल्यूडीकडून या पुलाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर या पुलाबाबत निर्णय होणार आहे.

इतर बातम्या :

Assam Mizoram Border Dispute: आसाम मिझोरम सीमा संघर्ष, मराठमोळे पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर जखमी, पायात गोळी लागली, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू

जनतेचा आक्रोश समजून घ्या, अंगावर धावून जाणं योग्य नाही; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना फटकारलं

अखेर पाच दिवसानंतर तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी

(Kalyan Gandhari bridge broken due flood bridge is been closed as precautionary measure)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें