AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Commissioner : केडीएमसी आयुक्त अॅक्शन मोडमध्ये, तीन दिवसात रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे आदेश

गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने महानगरपालिका पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली असून, कल्याण डोंबिवली परिसरातील मुख्य रस्त्यांवर डांबरीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.

KDMC Commissioner : केडीएमसी आयुक्त अॅक्शन मोडमध्ये, तीन दिवसात रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे आदेश
केडीएमसी आयुक्त अॅक्शन मोडमध्येImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 26, 2022 | 8:49 PM
Share

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे (Pothole) आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोज खड्ड्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सोशल मीडियावर देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. खड्ड्यांमुळे आरोग्यावर तर परिणाम होत असून अपघात देखील वाढलेत. लोकप्रतिनिधींनीही अनेक निवेदनं केडीएमसी आयुक्तांना दिलीत. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे (Dr. Bhausaheb Dangade) यांनी गोविंदवाडी रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याचं आढळल्यास त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, तसेच केडीएमसी हद्दीत पुन्हा कोणतेही काम दिले जाणार नाही असा इशारा (Warning) आयुक्तांनी यावेळी दिला.

पावसाने विश्रांती घेतल्याने महापालिका अॅक्शन मोडमध्ये

कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांच्या समस्येने नागरिक हैराण झालेत. वारंवार नागरिकांकडून होत आहे तर अवघ्या काही दिवसांमध्ये बापांचा आगमन होणार आहे. या आगमनाअगोदर कल्याण डोंबिवली परिसर खड्डे मुक्त करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष गणपती मंडळ वाहतूक पोलीस व विविध संस्थेने महानगरपालिकेला निवेदन दिल्यानंतर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र गेले काही दिवसापासून पावसाची उघडीप मिळत नसल्याने पेव्हर ब्लॉक, खडी, मुरुम, कोल्ड मिक्स याद्वारे खड्डे भरले जात असले तरी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हे सर्व प्रयत्न कमी पडत आहेत. गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने महानगरपालिका पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली असून, कल्याण डोंबिवली परिसरातील मुख्य रस्त्यांवर डांबरीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.

…तर कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल : आयुक्त

आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी गोविंदवाडी रस्त्याची पाहणी करत डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी येत्या तीन दिवसात शहरातील मुख्य रस्त्यांवरचे खड्डे व ज्या रस्त्यावरून गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. ते रस्ते 24 तास काम करत डांबरीकरण करण्याचे सूचना दिल्या. त्याचबरोबर रस्त्याचे काम चांगल्या दिवसाची झाले नाही किंवा या कामासाठी कोणताही ठेकेदार कमी पडला तर त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल तसेच केडीएमसी हद्दीत पुन्हा कोणतेही काम दिले जाणार नाही असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला आहे.

अस असलं तरी काही दिवसांपूर्वीच आयुक्त दांगडे यांनी 90 फीट रस्त्याची पाहणी केली होती. मात्र आयुक्तांची पाठ फिरताच खड्डे न बुजवता कामगार व ठेकेदार त्या ठिकाणाहून गायब झाले. त्या ठिकाणी खड्डे तसेच राहिले असा आरोप नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आता आयुक्तांचा आदेश कंत्राटदार आणि इंजिनियर्स किती पाळतात ते पहावं लागेल. (KDMC Commissioner in action mode, orders to complete asphalting of road in three days)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.