AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : निकालानंतर लगेच उद्धव ठाकरेंना पहिला झटका बसणार का? काल रिझल्ट लागला आणि आज एक नगरसेवक…

Uddhav Thackeray : काल महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. उद्धव ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या एका नगरसेवकाची कृती चर्चेचा विषय ठरली आहे. खरच असं झालं तर तो पहिला धक्का असू शकतो. निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अजून 24 तासही उलटलेले नाहीत.

Uddhav Thackeray : निकालानंतर लगेच उद्धव ठाकरेंना पहिला झटका बसणार का? काल रिझल्ट लागला आणि आज एक नगरसेवक...
Uddhav Thackeray
| Updated on: Jan 17, 2026 | 2:20 PM
Share

कालच मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात मुंबईसह शेजारच्या ठाण्यातील आणि कल्याण-डोंबिवलीमधील निवडणूक प्रतिष्ठेची होती. यात मुंबईत काही प्रमाणात ठाकरेंना आपला गड राखण्यात यश आलं. पण ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवला. कल्याण-डोंबिवलीत एकूण 122 नगरसेवक बसतात. इथे 21 नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आलेत. यात 15 भाजपचे आणि सहा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे होते. काल निकाल जाहीर झाला. त्यात केडीएमसीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 54 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले. केडीएमसीमध्ये युती नव्हती. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले.

आता कालच निकाल लागला. त्यानंतर KDMC मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच नवनिर्वाचीत नगरसेवक मधुर म्हात्रे थेट आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला पोहोचले. KDMC निवडणुकीतील विजयी उबाठाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांची खासदार श्रीकांत शिंदेंसोबत भेट झाली. भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मधुर म्हात्रे यांनी भाजपचे माजी उपमहापौर विक्की तरे यांचा पराभव करत विजय मिळवला. फोटो व्हायरल होताच संभाव्य राजकीय हालचालींवर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

आदित्य ठाकरेंनी फोन केलेला

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विजय झालेल्या उमेदवारांना आदित्य ठाकरे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 6 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं संपूर्ण पॅनल विजयी झालं. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी महापौर वैजयंती ताई घोलप आणि तीन वेळा नगरसेवक असलेले संजय पाटील अशा दिग्गज नगरसेवकांविरोधात लढून यश मिळवलं. ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांना आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉल करत शुभेच्छा दिल्या. या पॅनल मधून ठाकरे गटाचे निवडून आलेल्या संकेश भोईर यांचे आदित्य ठाकरेंनी खास शब्दांत अभिनंदन केले. पॅनल 6 मधील विजयामुळे कल्याण पश्चिमेत ठाकरे गटाचे बळ अधिक मजबूत झाले आहे.

शिंदे गट व भाजपकडून जोरदार बॅनरबाजी

कल्याण–डोंबिवलीत महायुतीला शंभरपेक्षा अधिक जागांवर विजय. निकालानंतर शिवसेना शिंदे गट व भाजपकडून जोरदार बॅनरबाजी. शिंदे गटाच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ व श्रीकांत शिंदेंचे फोटो. “दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा – शिवसेनेचा बालेकिल्ला” असा मजकूर ठळकपणे लिहिला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...