VIDEO: सरकार स्थिर आहे म्हणूनच आम्ही फिरतोय; जयंत पाटलांचा भाजपला टोला

| Updated on: Oct 22, 2021 | 4:48 PM

आमचं सरकार स्थिर आहे म्हणूच आम्ही फिरतोय. सरकार अस्थिर असते तर आम्ही मुंबईत राहून सरकार टिकवण्याचे प्रयत्न केले असते. तशी वेळ आमच्यावर अजून आलेली नाही. (maha vikas aghadi government stable and strong, says jayant patil)

VIDEO: सरकार स्थिर आहे म्हणूनच आम्ही फिरतोय; जयंत पाटलांचा भाजपला टोला
jayant patil
Follow us on

पालघर: आमचं सरकार स्थिर आहे म्हणूच आम्ही फिरतोय. सरकार अस्थिर असते तर आम्ही मुंबईत राहून सरकार टिकवण्याचे प्रयत्न केले असते. तशी वेळ आमच्यावर अजून आलेली नाही. आमचे सरकार स्थिर असून तिन्ही पक्ष एक दिलाने काम करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माहेबूब शेख यांचा आज दिवसभरासाठी पालघर दौरा सुरू आहे. यावेळी जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. दोन वर्षापासून सरकार कोसळणार असल्याचं ऐकत आहोत. पण आमचं सरकार स्थिर आहे. सरकार अस्थिर असते तर आम्ही मुंबईत राहून सरकार टिकवण्याचे प्रयत्न केले असते. तशी वेळ आमच्यावर अजून आलेली नाही. आमचे सरकार स्थिर असून तिन्ही पक्ष एकसंघपणे काम करत आहेत, असं पाटील यांनी सांगितलं. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तुंगारेश्वर फाटा येथील शेल्टर हॉटेलमध्ये वसई-विरार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्षबांधणीचा सल्ला दिला.

नवी पिढीच बदल घडवेल

दरम्यान, काल पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा वसईत पोहोचली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. आपला पक्ष प्रत्येक वॉर्डात… प्रत्येक मतदारसंघात वाढला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण आपल्या पंखाखाली घ्यायला हवे. त्यांच्या विचारांशी समन्वय साधायला हवा. ही नवी पिढीच इथे बदल घडवेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

बाहेर मोठा शत्रू आहे

आपला पक्ष म्हणजे शरद पवारसाहेबांचा एक विचार आहे. हा विचार भक्कम व्हायला हवा. यासाठी मी आणि माझे सहकारी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. मतांची बेरीज वाढवण्यासाठी तुम्ही तुमची रणनीती तयार करा, तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे, मला तुमच्याकडून चांगला निकाल पाहिजे. बाहेर शत्रू मोठा आहे, त्यामुळे त्याला पराभूत करण्यासाठी आपल्याला ताकद उभारावी लागेल ही खूणगाठ मनाशी बांधा, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

सर्वांना घेऊन चला

वसई-विरार, नालासोपारा हा भाग एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी इथल्या लोकांनी मोठे योगदान दिलेय. या भागात सर्व समाजाचे, सर्व भाषिक लोक राहतात, त्यामुळे इथे सर्वांना सोबत घेऊन राजकारण करावं लागेल, असे स्पष्ट मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. इथे किल्ला लढवणे सोपे नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत हे कौतुकास्पद आहे. हळूहळू का होईना इथे पक्ष वाढेल, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: जरंडेश्वरसह कोणता कारखाना कधी, कुणाला आणि कितीला विकला?; अजित पवारांनी सादर केली जंत्री

प्रभागातील समस्यांसाठी आता प्रभाग अधिकाऱ्यांना भेटा, मनापकडून 9 पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती, वाचा कोणत्या प्रभागात कोण अधिकारी?

आगीला जबाबदार कोण? फायर सिस्टम बंद, महापौर म्हणतात, सोसायटी मॅनेजमेंट, सिक्युरिटीवर कारवाई होणार

(maha vikas aghadi government stable and strong, says jayant patil)