प्रभागातील समस्यांसाठी आता प्रभाग अधिकाऱ्यांना भेटा, मनापकडून 9 पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती, वाचा कोणत्या प्रभागात कोण अधिकारी?

शहराच्या विविध भागांत स्वच्छता, ड्रेनेज, पाणी, रस्ते, नालेसफाई यासंबंधीच्या तक्रारींची संख्या अधिक असते. या सोडवण्यासाठी आता प्रत्येक प्रभागात पालिकेच्या एका प्रमुख अधिकाऱ्याची संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

प्रभागातील समस्यांसाठी आता प्रभाग अधिकाऱ्यांना भेटा, मनापकडून 9 पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती, वाचा कोणत्या प्रभागात कोण अधिकारी?
पालिक प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडून 9 अधिकाऱ्यांची नेमणूक

औरंगाबाद: शहरातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांना आता आपल्या समस्यांबाबत तक्रार मांडण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात जाण्याची गरज नाही. आता नागरिकांना जवळच्याच प्रभाग कार्यालयात जाऊन आपल्या समस्यांबाबत माहिती देता येईल. एवढेच नव्हे तर या समस्यांवर तत्काळ उपाययोजनादेखील केली जाईल, अशी योजना औरंगाबाद माहापालिकेतर्फे आखण्यात आली आहे.

9 प्रभागात 9 पालक अधिकारी

औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक प्रभागात एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. हे संबंधित प्रभागाचे पालक अधिकारी असतील. पांडेय यांनी महापालिकेतील 9 प्रभागासाठी 9 पालक अधिकाऱ्यांची (संनियंत्रण अधिकारी) नियुक्ती केली आहे. यासंबंधीचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत.

वसूलीवरसुद्धा लक्ष ठेवणार

शहराच्या विविध भागांत स्वच्छता, ड्रेनेज, पाणी, रस्ते, नालेसफाई यासंबंधीच्या तक्रारींची संख्या अधिक असते. या सोडवण्यासाठी आता प्रत्येक प्रभागात पालिकेच्या एका प्रमुख अधिकाऱ्याची संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याप्रमाणे प्रभागनिहाय नऊ अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना प्रत्येक प्रभागाच्या विविध वॉर्डातील प्राप्त होणाऱ्या समस्या व तक्रारींवर संबंधित भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाही करून घेण्यावर लक्ष द्यावे लागेल, असे आदेशात म्हटले आहे. यात कुणी कर्तव्यात कसूर करताना आढळल्यास त्यांच्यावर थेट आयुक्तांकरवी कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पालक अधिकाऱ्यांना आपल्या वॉर्डांतील मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीवरदेखील लक्ष ठेवावे लागणार आहे. प्रभागातून अधिकाधिक मालमत्ता व पाणीपट्टी करवसुली वाढवण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

शहरातील अधिकारी पुढीलप्रमाणे-

प्रभाग 1 ए. बी. देशमुख
प्रभाग 2 विजय पाटील, उद्यान अधीक्षक
प्रभाग 3 सौरभ जोशी, उपायुक्त
प्रभाग 4 संतोष टेंगळे, उपायुक्त
प्रभाग 5 डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य अधिकारी
प्रभाग 6 अ‍ॅड. अपर्णा थेटे, उपायुक्त
प्रभाग 7 एस.डी. काकडे, कार्यकारी अभियंता
प्रभाग 8 बी.डी. फड, कार्यकारी अभियंता
प्रभाग 9 संजय पवार, लेखाधिकारी

इतर बातम्या-

100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!

मनपा निवडणूक: औरंगाबाद शहरातील प्रभागाच्या कच्च्या नकाशांचे काम सुरु, वॉर्डांच्या सीमारेषा नव्याने आखल्या जाणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI