Maratha Reservation: तर ठाकरे-पवारांच्या बंगल्यात घुसू; संभाजी छत्रपतींच्या उपोषणानंतर मराठा ठोक मोर्चा आक्रमक

| Updated on: Feb 28, 2022 | 2:45 PM

मराठा समाजाच्या सात मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला बसलेल्या संभाजी छत्रपती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाही आक्रमक झाला आहे.

Maratha Reservation: तर ठाकरे-पवारांच्या बंगल्यात घुसू; संभाजी छत्रपतींच्या उपोषणानंतर मराठा ठोक मोर्चा आक्रमक
Sambhajiraje Chhatrapati
Follow us on

ठाणे: मराठा समाजाच्या सात मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला बसलेल्या संभाजी छत्रपती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाही (maratha kranti thok morcha) आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने संभाजी छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात जमले आहेत. संभाजीराजे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांवर चर्चा करण्याची किंवा सरकारसोबत बैठक करण्याची गरज नाही. सरकारने थेट पत्र घेऊनच आझाद मैदानात यावे, असं सांगतानाच आता आमचा संयम संपला आहे. आम्ही शांत बसणार नाही. या तीनचाकी सरकारचा आम्ही निषेध करतो. संध्याकाळपर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या बंगल्यात घुसू, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आणि रमेश खैरे-पाटील यांनी ही आक्रमक भूमिका मांडली आहे. संभाजी राजे यांनी मांडलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या पाहिजेत. या मागण्यांबाबत त्यांची आधीच सरकार सोबत चर्चा झाली आहे. सरकारने तेव्हा सकारात्मक भूमिकाही घेतली होती. फक्त त्याची अंमलबजावणी करायची बाकी आहे, सरकारने त्यावर त्वरीत निर्णय घ्यावा. आता चर्चेचा प्रश्नच येत नाही, असंही क्रांती मोर्चाने म्हटलं आहे.

इम्पेरिकल डेटा प्रमाणेच ओबीसींना आरक्षण द्या

यावेळी त्यांनी ओबीसींच्या आरक्षणावरही भाष्य केलं. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा scbc नावाने आम्ही देखील हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, ट्रिपल टेस्ट आणि इम्पेरिकल डाटा जमा करा. त्या पद्धतीने राज्य सरकाने काम केले पाहिजे. छगन भुजबळ यांच्या दबावाखाली सरकार काम करत आहे का? विजय वडेट्टीवार यांच्या दबावाखाली काम करत आहे का? ओबीसी राजकारणाला आमचा विरोध नाही. परंतु इम्पेरिकल डाटा जमा करूनच आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही सुप्रीम कोर्टाकडे केली आहे, असं समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितलं.

राज्यपालांचं वय वाढलंय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. भगतसिंह कोश्यारी यांचे वय वाढलेले आहे. महाराष्ट्र आणि देशाबाहेरही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु फक्त जिजाऊ होत्या. त्यामुळे राज्यपालांनी सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे, नाही तर राज्यपालांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश खैरे-पाटील यांनी दिला.

संबंधित बातम्या:

VIDEO: महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन सह्याद्री’ असतं; ‘ऑपरेशन गंगा’वरून राऊतांचा केंद्राला टोला

Maratha Reservation | महाराष्ट्र सरकारकडून छत्रपती संभाजी राजेंना चर्चेचे निमंत्रण; शिष्टाईचे प्रयत्न सुरू

Maratha Reservation | छत्रपतींची तब्येत बिघडली; डॉक्टरांचा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला, पण राजे ठाम