पालघरमध्ये लसीकरणाचा नवा विक्रम; एकाच दिवशी होणार एक लाख नागरिकांचं लसीकरण

पालघरमध्ये आज लसीकरणाचा नवा विक्रम होणार आहे. पालघरमध्ये आज एकाच दिवशी एक लाख लोकांचं लसीकरण होणार आहे. पालघरच्या ग्रामीण भागात हे लसीकरण होणार असून जिल्हा प्रशासनाने त्याची संपूर्ण तयारी केली आहे. (mega covid vaccination drive held at palghar district)

पालघरमध्ये लसीकरणाचा नवा विक्रम; एकाच दिवशी होणार एक लाख नागरिकांचं लसीकरण
vaccination

पालघर: पालघरमध्ये आज लसीकरणाचा नवा विक्रम होणार आहे. पालघरमध्ये आज एकाच दिवशी एक लाख लोकांचं लसीकरण होणार आहे. पालघरच्या ग्रामीण भागात हे लसीकरण होणार असून जिल्हा प्रशासनाने त्याची संपूर्ण तयारी केली आहे. (mega covid vaccination drive held at palghar district)

पालघरच्या ग्रामीण भागात आज मेगा लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. एकाच दिवशी एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाचे नियोजन पूर्ण झाले आहे. पालघरच्या ग्रामीण भागात ही लसीकरण मोहीम पार पडत आहे. जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागात एकाच दिवशी 1 लाख कोव्हिशिल्ड लसीचा साठा लसीकरण केंद्रांवर पुरविण्यात आला आहे.

रिक्षा, टमटम चालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था

164 शासकीय लसीकरण केंद्रावर कोव्हीशिल्ड लसीचा मोफत डोस देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे येथे रिक्षा, टमटम चालकांसाठी स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत 18 ते 60 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना लसीचा डोस मिळणार आहे.

नागरिकांची झुंबड

आज 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. लसीकरण सुरू होण्यााधी प्रत्येक केंद्रावर नागरिकांना मिळणार टोकन देण्यात आले आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, लस पटकन मिळावी म्हणून नागरिकांनी सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी केली आहे.

एका दिवसात 12 लाखांपेक्षा अधिक लसीकरण

दरम्यान, राज्यात एका दिवसात 12 लाखांच्यावर लसीकरण करून आपण आपली क्षमता सिद्ध केली आहे. लस अजून उपलब्ध झाली तर 12 ते 14 लाख लसीकरण रोज करता येईल. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितता देता येऊ शकेल आणि पर्यायाने तिसऱ्या लाटेची दाहकता कमी होईल. मोठ्या प्रमाणात लसीकरण करून तिसरी लाट थोपवायची असेल तर त्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या अधिसूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

5 जिल्ह्यांत एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्ण

केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात 31 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे. गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे. काल राज्यातील 4 ते 5 जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्णसंख्या आहे. त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल, तरच तिसरी लाट रोखता येईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवात गर्दी टाळा

आगामी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देतानाच शासनाच्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे येथील मंडळांनी, गणेश भक्तांनी शिस्तबद्धपणे कोविड नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन टोपे यांनी केले आहे. (mega covid vaccination drive held at palghar district)

 

संबंधित बातम्या:

कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी ठाण्यात विशेष लसीकरण सत्र

गणेशोत्सवदरम्यान ठाण्यात लसीकरण बंद राहणार, पालिका प्रशासनाचा निर्णय

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

(mega covid vaccination drive held at palghar district)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI