AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मग तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास आहात असं म्हणायचं का? मिनाक्षी शिंदे राऊतांवर भडकल्या

मीनाक्षी शिंदे यांनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी ठाकरे गटाच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असून, केवळ राजकीय स्वार्थासाठी मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, शिंदे गटाच्या नेत्यांनी या प्रकरणाचे राजकारण न करण्याचे आवाहन केले.

मग तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास आहात असं म्हणायचं का? मिनाक्षी शिंदे राऊतांवर भडकल्या
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 12:24 PM
Share

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाकरे गटाने मिनाक्षी शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. त्याला आज शिंदे गटाच्या नेत्या, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे. या खूनाशी आमचा कोणताही संबंध नाही. केवळ एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असल्याने आमच्यावर आरोप केले जात आहेत, असा दावा मिनाक्षी शिंदे यांनी केला. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं नाव आलं आहे. मग त्यांनाही अटक करणार का? असा सवाल करतानाच दबाव टाकून या प्रकरणात माझं नाव गोवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेवरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मला एकनाथ शिंदेच्या खासमखास आहेत, असे म्हणाले होते. पण परवा जेव्हा ते ठाण्यात आले होते, तेव्हा आदित्य ठाकरे त्यांच्या बाजूला बसले होते. पण तुम्ही एकटेच बोलत होते. मग आम्ही असं म्हणायचं का की तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास आहात?, असा सवाल मिनाक्षी शिंदे यांनी केली.

मेल्यानंतर टाळूवरचं लोणी…

माझ्या प्रभागात प्रदीप पुर्णेकर यांची दोन दिवसापूर्वी हत्या करण्यात आली. ती दुर्दैवी घटना आहे. एफआयआरमध्ये माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. पण त्यानंतर काही राजकीय नेते आले आणि माझ नाव त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. माणूस मेल्यानंतर त्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि आदित्य ठाकरे करत आहेत. माणूस मेल्यानंत्रही राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी मृतदेहाची विटंबना केली. माझ्यविरोधात कोणतेही पुरावे नसताना मला टारगेट केले जात आहे. महिलेला गोवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप मिनाक्षी शिंदे यांनी केला.

आरोप चुकीचे

मिनाक्षी शिंदे यांनी कालच प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर सोशल मीडियावरून अधिकृत भूमिका मांडली होती. गेल्या 20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असा आरोप पहिल्यांदाच झाला असून, वैचारिक मतभेद असले तरी कोणाचाही जीव घेण्याची परिस्थिती माझ्यावर आलेली नाही. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना दुर्दैवी असून, या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार असून, बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असा त्यांनी केला होता. आदित्य ठाकरे, संजय राऊत हे राजकारण करण्यासाठी ठाण्यात आले आहेत, असा आरोपही त्यांनी केला असून, आपल्यावरील आरोप चुकीचे आहेत, असे त्यांनी म्हटलंय.

Follow Us
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...