KDMC Pothole : आता खड्ड्याची तक्रार करा टोल फ्री नंबरवर, केडीएमसी घेणार 48 तासांत दखल

महापालिकेने ॲक्शन मोडवर येत केडीएमसी हद्दीतील सर्व प्रभागात 15.15 कोटींचा निधी देत 13 कंत्राटदारांमार्फत खडीकरण, जीएसबी आणि कोळमेंट्सद्वारे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. वाढत्या खड्ड्यांची समस्या लक्षात घेत 02512201168 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे.

KDMC Pothole : आता खड्ड्याची तक्रार करा टोल फ्री नंबरवर, केडीएमसी घेणार 48 तासांत दखल
कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्लूचा धोका वाढला!Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 8:59 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमीच खड्ड्यांमुळे चर्चेत असते. जुलै महिन्यात पावसाने हाहाःकार केला आहे आणि पुन्हा रस्त्यांच्या कामाची पोलखोल झाली आहे. वाढत्या खड्ड्यांची समस्या (Pothole Problems) लक्षात घेत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पालिकेने 15.15 कोटीचा निधी देत 13 कंत्राटदारांमार्फत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरवात करत टोल फ्री नंबर (Toll Free Number) सुरू केला आहे. यावर फोन करून नागरिक आपली तक्रार (Complain) करू शकतात. तसेच 48 तासांच्या आत या तक्रारीची दखल प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचे केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी सांगितलं. मात्र जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असल्याने खड्डे भरायला अनेक अडचणी येत आहेत. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस पडला नसताना देखील खड्डे बुजवले गेले नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.

वाढत्या खड्ड्यांची समस्या लक्षात घेत टोल फ्री नंबर सुरू केला

कल्याण, डोंबिवली, शहरातील सर्व प्रमुख रस्ते तसेच शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे झाल्याने नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना काही मिनिटांचे अंतर पार करायला तासन्तास लागत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर सर्वच विभाग तसेच महापालिका प्रशासन सर्व काही जाणूनही याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत गेल्या 6 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ऑनलाइन मिटिंग घेत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने ॲक्शन मोडवर येत केडीएमसी हद्दीतील सर्व प्रभागात 15.15 कोटींचा निधी देत 13 कंत्राटदारांमार्फत खडीकरण, जीएसबी आणि कोळमेंट्सद्वारे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. वाढत्या खड्ड्यांची समस्या लक्षात घेत 02512201168 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर फोन करून नागरिक आपली तक्रार करू शकतात. तसेच 48 तासांच्या आत या तक्रारीची दखल प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. (Now report the pit to toll free number, KDMC will take notice within 48 hours)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.