Devendra Fadanvis : खऱ्या आरोपींना शोधा अन्यथा भाजप पोलीस ठाण्याला घेराव करणार, देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधारी आणि पोलिसांना इशारा

आज राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मनोज कटके या भाजप कार्यकर्त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी डोंबिवली एम्स रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. इतकेच नव्हे तर डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आणि गुन्हा उशिराने दाखल करण्याबाबतही टीका केली.

Devendra Fadanvis : खऱ्या आरोपींना शोधा अन्यथा भाजप पोलीस ठाण्याला घेराव करणार, देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधारी आणि पोलिसांना इशारा
खऱ्या आरोपींना शोधा अन्यथा भाजप पोलीस ठाण्याला घेराव करणार
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 10:23 PM

डोंबिवली : भाजप कार्यकर्ता मनोज कटके (Manoj Katke) यांच्यावर हल्ला (Attack) करणाऱ्या खऱ्या आरोपींना शोधून त्यांच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे. पोलीस राजकीय दबावात काम करत असतील तर याबाबत विधानसभेत प्रश्न उचलू, वेळ पडली तर मोर्चा काढू आणि मी त्या मोर्चात सहभागी होणार आणि पोलीस ठाण्याला घेराव घालणार असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं आहे. राजकारणातलं गुन्हेगारीकरण पाहायला मिळतंय. त्याला शासनाचे संरक्षण पाहायला मिळतंय. महाराष्ट्र अधोगतीकडे जातोय. महाराष्ट्रात पोलिस दल कधी इतक्या राजकीय दबावात काम करत नव्हते. आता जो राजकीय दबाव पाहायला मिळतोय ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी हे अतिशय घातक आहे असेही फडणवीस म्हणाले. (Opposition leader Devendra Fadnavis warns the ruling party and police)

भाजप कार्यकर्त्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फडणवीस आले होते

आज राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मनोज कटके या भाजप कार्यकर्त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी डोंबिवली एम्स रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. इतकेच नव्हे तर डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आणि गुन्हा उशिराने दाखल करण्याबाबतही टीका केली. यावेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला शहराध्यक्ष पूजा पाटील, नगरसेवक मंदार हळबे, माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे तसेच माजी नगरसेवक शैलेश धात्रक, राहुल दामले मोरेश्वर भोईर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चा

भाजपाकडून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मंत्रीपदातून हटवण्याकरीता 9 तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्च्याच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन मुंबईतील के.सी.कॉलेज हॉलमध्ये करण्यात आले होते. बैठकीत भाजप आमदार, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळर, आमदार यांनीही मार्गदर्शन केले. (Opposition leader Devendra Fadnavis warns the ruling party and police)

इतर बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला ठाकरे सरकारला भाग पाडू, भाजप किसान मोर्चात देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

निवडणूक आयोगाचे अधिकार कमी होणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.