AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar Earthquake: दुष्काळाच्या सावटादरम्यान नैसर्गिक संकट, मराठवाड्यानंतर पालघर भूकंपानं हादरलं, नागरिकांची धावाधाव, परिसरात भीतीचं वातावरण

Palghar Earthquake: राज्यात दुष्काळाचे सावट असतानाच नव्या नैसर्गिक संकटाची चाहुल लागली आहे. मराठवाड्यानंतर पालघर भूकंपानं हादरले आहे. यामुळे जनमाणसात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Palghar Earthquake: दुष्काळाच्या सावटादरम्यान नैसर्गिक संकट, मराठवाड्यानंतर पालघर भूकंपानं हादरलं, नागरिकांची धावाधाव, परिसरात भीतीचं वातावरण
पालघर भूकंपाने हादरलं
| Updated on: Oct 09, 2026 | 8:50 AM
Share

Palghar Earthquake: राज्यावर दुष्काळाचे सावट असतानाच नवीन नैसर्गिक संकटाची चाहुल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्याचे हादरे पार नांदेड, परभणी आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांपर्यंत आहे. तर आता पश्चिमेकडील पालघर जिल्ह्याही भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. पालघर जिल्ह्यातील 4 ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गुरुवारी सायंकाळी 7 वाजून 16 मिनिटींनी 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली. यामुळे नागरीक घाबरले. त्यांनी घराबाहेर धाव घेतली. सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

गेल्या काही वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्याला सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. काल तलासरी, धुंदलवाडी, मोडगाव आणि कासा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिक भीतीच्या छायेत आहेत. कधी रात्री तर कधी दिवसा भूकंपाचे सौम्य धक्का जाणवत असतात. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हिंगोली-नांदेडला हादरे

हिंगोली आणि नांदेडच्या सीमावर्ती भागांत गेल्या काही दिवसांत रिश्टर स्केलवर 3 ते 4 तीव्रतेचे अनेक भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत. केंद्राच्या भूगर्भीय संशोधन संस्थांकडून यावर लक्ष ठेवण्यात येत असले, तरी वारंवार भूमी का कंप पावते याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. विशेषतः डेक्कन ट्रॅपमधील फॉल्ट लाईन्स आणि भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा किंवा हालचाली यामागे कारणीभूत असू शकतात, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे

1500 कोटींची तरतुदीची मागणी

राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या भूकंप संदर्भात संसदेत आवाज उठवल्यानंतर केंद्राच्या टीमने भूकंपग्रस्त गावांना भेटी दिली. उपाययोजनाचा आराखडा तयार केला. भूकंपाच्या एरियामध्ये संरक्षणाची तरतूद करण्यासाठी 1500 कोटिंच्या तरतुदीची आवश्यकता आहे, पहिल्या टप्प्यात हॉस्पिटल ,शाळा ह्या सह इतर उपयोजनासाठी 500 ते 700 कोटींची केंद्राकडे मागणी करणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार रामराव वडकूते यांनी दिली आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे भूकंपमापक केंद्र कार्यान्वित

हिंगोली जिल्ह्यात वारंवार जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची अचूक नोंद घेण्यासाठी उपाययोजना करा अशी मागणी राज्यसभा खासदार रामराव वडकूते यांनी राज्यसभे मध्ये केली होती ,त्यानंतर भारतीय भूकंपशास्त्र संस्थेच्या वतीने भूकंपाचे केंद्र बिंदू असलेल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय भूकंपमापन विज्ञान केंद्र कार्यान्वित केले आहे . या केंद्रात नोंदविला जाणारा भूकंपाचा डेटा ‘रिअल टाइम’मध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडे जाणार आहे. त्यामुळे भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू आणि अन्य भूकंपीय बाबींचा तातडीने अंदाज घेण्यास मदत होणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच