AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन; एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या आठवड्यात त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी रात्रीपासून त्यांची तब्येत खालावली होती. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन; एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त
डॉ. आनंद नाडकर्णीImage Credit source: Instagram
| Updated on: May 15, 2026 | 10:59 AM
Share

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं आज (शुक्रवार) सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनाने ठाणे शहरासह साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ. आनंद नाडकर्णी हे ठाण्यातील समता नगर भागात राहत होते. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या आठवड्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्या आरोग्यासंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती. शस्त्रक्रियेनंतर ते बरे झाले होते. परंतु गुरुवारी रात्रीपासून त्यांची तब्येत खालावली होती. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी 1980 साली एम.बी.बी.एस आणि 1984 साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या होत्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींन विरुद्ध चळवळ उभारण्यासाठी त्यांनी 23 मार्च 1990 रोजी ठाणे शहरात आयपीएस अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मोठं कार्य केलं. लेखक व्याख्याते आणि समुपदेशक म्हणूनही त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित नाडकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

एकनाथ शिंदे यांची पोस्ट-

‘ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय धक्का देणारं आहे. असिम उर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉ. नाडकर्णी हे ठाण्याचे लाडके सुपूत्र. गेली साडेतीन दशकं मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी निरलसपणे काम केलं. ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ हे ब्रीद घेऊन त्यांनी इन्सिट्यूट फॉर सायकॉलॉजी या संस्थेची स्थापना केली. हजारो अस्थिर मनांना सावरून त्यांच्या कुटुंबियांचं ते खऱ्या मित्र बनले. त्याचवेळी, कै. डॉ. सुनंदा अवचट यांच्या साथीने त्यांनी पुण्यात ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. या दोन्ही संस्थांनी समाजाची केलेली सेवा ही कोणत्याही स्वयंसेवी संस्थेनं कशाप्रकारे काम करावं याचंच एक आदर्श प्रमाण आहे’, असं त्यांनी लिहिलं.

‘मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात व्यग्र असताना त्यांच्यात महाविद्यालयीन काळापासून कार्यरत असलेला लेखक, नाटककारही तेवढाच सक्रिय राहिला. ‘गद्दे पंचविशी’, ‘वैद्यक सत्ता’ यासह ‘शहाण्यांचा सायकिएट्रीस्ट’, ‘मनमैत्रीच्या प्रदेशात’ अशी सुमारे 27 प्रकाशित पुस्तकं वाचकप्रिय आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहेत. नाट्य क्षेत्रात ‘जन्मरहस्य’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘रंग माझा वेगळा’ ही नाटकंही रसिकप्रिय झाली. डॉ. नाडकर्णी यांच्या निधनामुळे उत्तम मनोविकारतज्ज्ञ, ललित लेखक, कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते, तत्वज्ञानाचे कृतीशील अभ्यासक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,’ अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?