Raj Thackeray Speech : राज ठाकरेंची सभा ऐकायला आलेला “हनुमान” पोलिसांच्या ताब्यात, कारण काय?

राज ठाकरेंची आजची सभा पार काश्मीरपर्यंत दाखवण्यात आली. काश्मीरमध्येही राज ठाकरेंच्या या सभेचे स्क्रीन लावून लाईव्ह प्रदर्शन करण्यात आले. या सभेला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं आल्याचेही सांगण्यात आले. असाच राज ठाकरेंचा आणि हनुमानाचा एक फक्त भाषण ऐकायाला आयोध्येवरून आला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Raj Thackeray Speech : राज ठाकरेंची सभा ऐकायला आलेला हनुमान पोलिसांच्या ताब्यात, कारण काय?
हनुमानाच्या पोशाखातील व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 10:13 PM

मुंबई : गुढी पाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेनंतर आज राज ठाकरेंची (Raj Thackeray Thane Speech) ठाण्यातही वादळी सभा पार पडलीय. शिवतीर्थावरूनही राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून (Hindutva) चौफेर बॅटिंग केली होती. तर मशीदीवरील भोंग्यावरही (Masjid Loude Speaker) जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर मशीदीवरील भोंगे उतरले नाही तर मशीदीसमोर हनुमान चालीसा लावा, असे आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं.राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून जोरदार टिकाही झाली. मात्र या सभेनंतर हिंदु्त्वाची भूमिका घेल्याने भाजपसहीत एक मोठा वर्ग खूशही आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आजची सभा पार काश्मीरपर्यंत दाखवण्यात आली. काश्मीरमध्येही राज ठाकरेंच्या या सभेचे स्क्रीन लावून लाईव्ह प्रदर्शन करण्यात आले. या सभेला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं आल्याचेही सांगण्यात आले. असाच राज ठाकरेंचा आणि हनुमानाचा एक फक्त भाषण ऐकायाला आयोध्येवरून आला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सभेसाठी आलेल्या भक्ताला घेतला ताब्यात

आयोध्येतून आलेला हा हनुमान भक्त फक्त सभेसाठी नव्हता आला तर तो चक्क हनुमानाची वेशभूषा धारण करून, हनुमान बनुनच सभेला आला होता. मात्र त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. सभेच्या आधीच पोलिसांनी याला ताब्यात घेतल्याने त्याला राज ठाकरेंचं भाषणही ऐकता आलं की नाही, याबाबतही शंकाच आहे. पालघर वरून महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी याला हनुमान वेशभूषेत आणले होते. तो राज ठाकरे यांचा चाहता आहे त्याला देखील भाषण ऐकायचे होते, मात्र या कारवाईने त्यांच्या आनंदावर विर्जन पडले आहे.

राज ठाकरेंचा मी फॅन

मी आयोध्येवरून आलो आहे. मी राज ठाकरेंचा मोठा फॅन आहे. त्यांना ऐकायला मी इथे आलो आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याने आम्हाला ते बाळासाहेब ठाकरेंचं दुसरं रुप वाटतं, अशी प्रतिक्रिया या राज ठाकरेंच्या फॅनने दिली होती. तर याला राज ठाकरेंच्या मशीदीवरील भोंग्याबाबत विचारले असता, राज ठाकरेंनी दिलेल्या घोषणेला आमचं पूर्ण समर्थन आहे, आम्ही त्यामुळे खूश आहोत, असे तो यावेळी म्हणाला आहे.

Raj Thackeray Thane News: तर अमेरिकेतून मनसेच्या नगरसेवकाला फोन येतील, वसंत मोरेंनी किती ऑफर धुडाकावल्या?

Vasant More Speech : ‘दादा, पंधरा वर्षे भाजपच्याच नगरसेवकाला पाडून नगरसेवक होतोय मी’, जेव्हा वसंत मोरेंनी चंद्रकांत पाटलांची ऑफर धूडकावली

Raj Thackeray Thane Uttar Sabha Live: राज ठाकरेंचा भाजपला इशारा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन मागण्या!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.