Ulhasnagar Accident : उल्हासनगरात रिक्षा-टेम्पोची जोरदार धडक, काचा चेहऱ्यात घुसल्याने रिक्षाचालक जखमी

Ulhasnagar Accident : उल्हासनगरात रिक्षा-टेम्पोची जोरदार धडक, काचा चेहऱ्यात घुसल्याने रिक्षाचालक जखमी
उल्हासनगरात रिक्षा-टेम्पोची जोरदार धडक

नवनाथ मोरे हे रिक्षाचालक कल्याणहून व्हीनस चौकात भाडे घेऊन आले होते. व्हीनस चौकातून लालचक्कीकडे जात असताना रस्त्यात एक टेम्पो अचानक यू टर्न मारून नवनाथ यांच्या रिक्षासमोर आला. त्यामुळे नवनाथ यांनी थेट या टेम्पोला धडक दिली.

निनाद करमरकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 21, 2022 | 10:55 PM

उल्हासनगर : रॉंग साईडने आलेल्या टेम्पोला रिक्षाने धडक दिल्याने अपघाता (Accident)ची घटना उल्हासनगरात घडली आहे. या अपघातात रिक्षाचालक (Auto Driver) जखमी (Injured) झाला असून त्याच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाल्या आहेत. नवनाथ मोरे असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. जखमी नवनाथला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात रिक्षाचेही नुकसान झाले आहे. या अपघाताची पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आली नाही. (Rickshaw driver injured in rickshaw-tempo accident in Ulhasnagar)

रिक्षाच्या काचा चेहऱ्यात घुसल्याने चालक जखमी

नवनाथ मोरे हे रिक्षाचालक कल्याणहून व्हीनस चौकात भाडे घेऊन आले होते. व्हीनस चौकातून लालचक्कीकडे जात असताना रस्त्यात एक टेम्पो अचानक यू टर्न मारून नवनाथ यांच्या रिक्षासमोर आला. त्यामुळे नवनाथ यांनी थेट या टेम्पोला धडक दिली. या अपघातात रिक्षाच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले असून रिक्षाच्या काचा नवनाथच्या चेहऱ्यात घुसल्याने त्यांना मोठी इजा झाली. या घटनेनंतर टेम्पो चालकानेच त्यांना उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. चूक कोणाची ते नंतर बघू, पण आधी माणुसकी म्हणून आपण रिक्षाचालकाला रुग्णालयात आणल्याचे टेम्पो चालकाने सांगितले. दरम्यान, या अपघाताप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

भरधाव डंपरने पाळीव श्वानाला चिरडले

एका भरधाव डंपर चालकाने पाळीव श्वानाला चिरडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्पमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातील कालीमाता मंदिराच्या मागे सागर गरजमल हे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे रॉटविलर जातीची चार वर्षीय श्वान होती. रविवारी सकाळच्या सुमारास सागर हे कुत्रीला घराबाहेर फिरवत असतानाच अचानक भरधाव वेगात एक डंपर आला आणि त्याने कुत्रीला धडक देत चाकाखाली चिरडले. या घटनेत कुत्रीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. अपघाताची ही संपूर्ण घटना सागर यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Rickshaw driver injured in rickshaw-tempo accident in Ulhasnagar)

इतर बातम्या

Pune Crime : घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे चाकण पोलिस ठाण्यातून पलायन

Video | दानपेटीतील रक्कम चोरता आली नाही म्हणून दानपेटीच पळवली, मालेगावातील महादेव मंदिरात खळबळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें