Kalyan Protest : मलंगगड परिसरात महावितरणचं अघोषित लोडशेडिंग, शिवसेनेनं अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात पेटवल्या मेणबत्या

| Updated on: Apr 24, 2022 | 12:14 AM

शिवसेनेचे स्थानिक नेते महेश गायकवाड, चैनू जाधव, राहुल पाटील, युवराज पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र यावेळी पाटील यांच्या दालनातील लाईट, एसी, पंखे बंद करून त्यांच्याशी अंधारात चर्चा करण्यात आली.

Kalyan Protest : मलंगगड परिसरात महावितरणचं अघोषित लोडशेडिंग, शिवसेनेनं अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात पेटवल्या मेणबत्या
मलंगगड परिसरात महावितरणचं अघोषित लोडशेडिंग
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अघोषित लोडशेडिंग (Load Shedding) सुरू करण्यात आलं आहे. याविरोधात शनिवारी शिवसेनेनं कल्याणच्या तेजश्री या महावितरण कार्यालयावर मोर्चा (Morcha) काढला. शिवसेनेच्या नेतृत्त्वात निघालेल्या या मोर्चात मलंगगड परिसरातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. तर महिलांनीही मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिवसेनेचे स्थानिक नेते महेश गायकवाड, चैनू जाधव, राहुल पाटील, युवराज पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र यावेळी पाटील यांच्या दालनातील लाईट, एसी, पंखे बंद करून त्यांच्याशी अंधारात चर्चा करण्यात आली. तसंच त्यांना लोडशेडिंगच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या दालनात शिवसेनेनं मेणबत्त्या पेटवत लोडशेडिंगचा प्रतिकात्मक निषेध केला. (Shiv Sena agitation against load shedding in Kalyan Malanggad area)

यानंतर जर रात्रीची अघोषित लोडशेडिंग बंद झाली नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी दिला. तर लोडशेडिंग बंद न झाल्यास महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना एक रात्र मलंगगड भागात मुक्कामाला घेऊन जाऊ, असा इशारा चैनू जाधव यांनी दिला.

लोडशेडिंगविरोधातील मोर्चावर भाजप आमदारांची टीका

हा मोर्चा म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री किंवा अजितदादांच्या बंगल्यावर मोर्चा काढावा, असा खोचक टोला कल्याण पूर्वेचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी लगावलाय. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच सरकारच्या विरोधात मोर्चा काढतात, त्यामुळं आपलं सरकार काही काम करत नाही हे त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही समजलं आहे, अशी टीका गणपत गायकवाड यांनी यावेळी केली. तसंच 2014 पूर्वी केंद्रात आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना लोडशेडिंग होत होती, पण 2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर लोडशेडिंग बंद झालं, असंही गायकवाड म्हणाले. (Shiv Sena agitation against load shedding in Kalyan Malanggad area)

इतर बातम्या

Ulhasnagar Fraud : चंद्रावर जमीन घेणाऱ्यानं 770 स्क्वेअर फूट जागा लाटली? उल्हासनगरच्या राम वाधवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

VIDEO : उल्हासनगरात भरधाव कारचालकाची अनेक गाड्यांना धडक, घटना सीसीटीव्हीत कैद