‘उद्धव साहेबांची कीव वाटते’, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांचा घणाघात

कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

'उद्धव साहेबांची कीव वाटते', शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 8:33 PM

गणेश थोरात, Tv9 मराठी, ठाणे | 15 जानेवारी 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना चॅलेंज देण्यासाठी ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती समोर आली आहे. पण याबाबतच्या वृत्तावर शिवसेनेच्या नेत्या आणि ठाणे महापालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी टीका केलीय. “ही तर हसण्यासारखीच गोष्ट आहे. सुषमा अंधारे यांचं अस्तित्व काय हेच मुळात कळलेलं नाही. एकीकडे उद्धव ठाकरे सांगत आहेत की निष्ठावंत कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. मात्र निष्ठेची व्याख्या काही त्यांची कळलेली नाही. बाहेरून जर त्यांना भाडोत्री उमेदवार द्यावा लागत असेल तर कल्याण लोकसभेसाठी एकही निष्ठावंत त्यांच्याकडे उरलेल्या नाही, असं मला वाटतं. सुषमा अंधारे यांनी यापूर्वी अनेकदा देवी-देवतांवर टीका केलीय, बाळासाहेबांवर टीका केलीय, अशा बाईला कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची जर मागणी होत असेल तर मला असं वाटतं की श्रीकांत शिंदे यांची उंची मोठी आहे”, असं मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.

“श्रीकांत शिंदे यांना संसद रत्न पुरस्कार दिला गेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तशा पात्रतेचा उमेदवार एकही त्यांच्याकडे उरलेला नाही. सुषमा अंधारे यांचा बळीचा बकरा करत आहेत, असं मला वाटतं. कारण त्यांच्या बरोबरीचा उमेदवार त्यांना कुठेही दिसत नाही. एकीकडे त्यांच्याच गटाचे सुभाष भोईर इच्छुक होते. मात्र त्यांच्या नावाचा उल्लेख कुठेही दिसत नाही, मग ते निष्ठावंत नाहीत का? तिथे ही मुळात शंका उपस्थित होते”, अशी टीका मीनाक्षी शिंदे यांनी केली.

‘उद्धव साहेबांची कीव वाटते’

“उद्धव साहेबांची कीव वाटते. कारण आम्ही एकेकाळी त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. त्यांनी अशाप्रकाचे निष्ठावंत पुढे आणले ज्यांनी एकेकाळी आपल्यावर टीका केली होती. यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट नाही, याची शोकांतिका किंवा दुःख आम्हाला वाटतं. उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेचा दौरा केल्यानंतर त्यांच्या लोकांना त्यांची ताकद दिसली असेल. त्यांच्या ताकदीचा अनुमान त्यांनी घेतला असेल म्हणून त्यांना भाडोत्री उमेदवार म्हणून सुषमा अंधारे आणण्याची वेळ येतेय”, असा टोला मीनाक्षी शिंदे यांनी लगावला.

‘सुप्रीम कोर्टात शिदेंच्याच बाजूने निकाल लागेल’

“सुप्रीम कोर्टात देखील एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागेल. सत्याच्या बाजूचा विजय होईल. पात्र-अपात्रचा निकाल लागला आहे. उबाठा गटातील देखील लोकं वाट बघत होती. आता त्यांची देखील शिवसेनेत येण्यासाठी रीघ लागणार आहे. उर्वरित संख्या आमच्याकडे येणार आहे. अबकी बार मोदी सरकार येणार”, असा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला.

‘शेंबडा मुलगा देखील वल्गना करतो’

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोपरी पाचपाखडी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं आहे. त्यावर मीनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “यापूर्वी काम केले असते तर अशा प्रकारच्या वल्गना केल्या नसत्या. अगोदर दौरा करणे गरजेचे होते. शेंबडा मुलगा देखील वल्गना करतो. अशा वल्गनांना आम्ही किंमत देत नाही. घरात बसणारे आता बाहेर येऊन बोंबलत असतील त्याला काय अर्थ नाही”, अशी टीका मीनाक्षी शिंदे यांनी केली.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.