मुंबई पाठोपाठ ठाण्यातही 500 चौ. फुटापर्यंत घरांना करमाफी मिळणार, नेमकी योजना काय? वाचा सविस्तर

मुंबई पाठोपाठ ठाण्यातही 500 चौ. फुटापर्यंत घरांना करमाफी मिळणार, नेमकी योजना काय? वाचा सविस्तर
सांकेतिक फोटो

मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांबाबत कर माफीचा निर्णय लवकरच होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 02, 2022 | 6:26 PM

ठाणे : 1 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. असाच निर्णय लवकरच ठाणे महापालिकेत घेतला जाणार असल्याची माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांबाबत कर माफीचा निर्णय लवकरच होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनाही लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.

महासभेत प्रस्ताव मंजूर

ठाणे महापालिकेच्या मागील महासभेत हा  प्रस्ताव मंजूर झाला असून त्यावर शासन दरबारी काम सुरु आहे. याबाबत विरोधी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, विनाकारण राजकारण करू नये, असेही महापौर म्हणाले आहेत. महानगरपालिकेच्या ठरावानुसार पालिकेच्या नियमात बदल करून त्यावर मंत्री मंडळात निर्णय झाल्यानंतर तो प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे पाठवण्यात येईल. या कर माफीमुळे पालिकेच्या तिजोरीवर देखील भार पडणार आहे. मालमत्ता कर हा महापलिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत या करापोटी कोटी रुपये जमा होतात. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी दिली तर वर्षाकाठी पालिकेच्या तिजोरीत सुमारे 150 कोटी रुपये तूट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या निर्णयाचा लाखो ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांवरील आर्थिक ताण यामुळे कमी होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर राजकारण सुरू

मुंबईसाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकात पराभव दिसत असल्याने शिवसेनेने हा निर्णय घेतल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय, तर ही भाजपची पोटदुखी आहे, त्यामुळे ते आग लावत आहेत, अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी सर्वसामान्य दुकानदारांना करमाफी देऊन सरकार दिलासा देणार का? असा सवाल उपस्थित केला होता, त्यावरून महापौरांनी ही टीका केली आहे.

उद्यापासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; मुंबई महापालिका सज्ज, 9 केंद्रांवर लसीकरणाची सोय

टांझानियन कलाकारानं केलं हिंदी गाण्याचं रि-क्रिएशन! ‘हा’ Video पाहा, होतोय तुफान Viral!!

Blackberry युजर्ससाठी वाईट बातमी! 4 जानेवारीपासून तुमचे मोबाईल वापरता येणार नाहीत, आत्ताच बॅकअप घ्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें