शिंदेंनाही विश्वास बसणार नाही असं घडलं.. ठाण्यात प्रचंड मोठा धक्का!

Thane Municipal Corporation Election Results 2026: ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

शिंदेंनाही विश्वास बसणार नाही असं घडलं.. ठाण्यात प्रचंड मोठा धक्का!
Eknath Shinde
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2026 | 12:59 PM

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (15 जानेवारी) निवडणुका घेण्यात आल्या. ठाणे महानगरपालिकेत 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीतही एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. 2017 च्या निवडणुकीमध्ये ठाण्यात शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानावर होतं. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. ठाणे महानगरपालिकेच्या सुरुवातीला कलांनुसार शिंदेंची शिवसेना 25 जागांवर तर भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट एका जागेवर, मनसे एका जागेवर आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 7 जागांवर आघाडीवर आहे.

2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी शिवसेनेनं 67 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागा जिंकल्या होत्या. 23 नगरसेवकांसह भाजप तिसऱ्या स्थानावर होता. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर त्यांची राज्याच्या राजकारणातील पुढची वाटचाल कशी असेल, हे देखील ठरण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना फुटली असली तरी बहुतांश माजी नगरसेवक शिंदे गटासोबत आहेत.

Live

Municipal Election 2026

01:18 PM

Latur Nagarsevak Election Results 2026 : लातूर महापालिकेतून हैराण करणारी अपडेट...

01:04 PM

Maharashtra Election Results 2026 : मालेगावात चर्चेत नसलेल्या पक्षाची थेट धमाकेदार कामगिरी...

01:11 PM

Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 166, 73 चा निकाल काय?

01:06 PM

Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 147, चारचा निकाल काय?

01:08 PM

Sangli Municipal Election Results 2026 : सांगली महापालिका प्रभाग 13 चा निकाल समोर

01:07 PM

Solapur Municipal Election Results 2026 : सोलापूर प्रभाग 11 चा निकाल समोर, भाजचे सर्व उमेदवार विजयी

ठाणे महानगरपालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. फक्त 1987 ते 1993 या काळात ठाणे महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. हे वगळता ठाणे म्हणजे शिवसेना हे समीकरण अविभाज्य राहिलं आहे. त्यामुळे यंदा ठाणे महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

ठाणे महापालिक निवडणुकीत शिंदेंनी जोरदार प्रचार केला होता. महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी दुचाकी रॅलीसुद्धा काढली होती. ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा, असं आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केलं. पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य या सर्व श्रेक्षात ठोस कामं करण्यात आली असून भविष्यातही विकासाची गती अधिक वाढवली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. शिवसेनेच्या पाठीशी एकजुटीने उभं राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं होतं.