Thane: भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलाव शंभर टक्के भरला, पाण्याची चिंता मिटली

ठाणे, शहराला पाणीपुरवठा करणारा वऱ्हाळादेवी तलाव (vharldevi lake) मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागला आहे. वऱ्हाळादेवी तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने जुन्या भिवंडीतील सुमारे एक लाख रहिवासी नागरिकांना भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्‍न आता मार्गी लागला आहे. याबद्दल समाधान व्यक्‍त केळे जात असले, तरी लाखो लिटर पाणी नाले-गटारात वाहून जात असल्याने सर्वसामान्य नागरिक व नगरसेवकांकडून मात्र नाराजी […]

Thane: भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलाव शंभर टक्के भरला, पाण्याची चिंता मिटली
नितीश गाडगे

|

Jul 21, 2022 | 4:28 PM

ठाणे, शहराला पाणीपुरवठा करणारा वऱ्हाळादेवी तलाव (vharldevi lake) मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागला आहे. वऱ्हाळादेवी तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने जुन्या भिवंडीतील सुमारे एक लाख रहिवासी नागरिकांना भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्‍न आता मार्गी लागला आहे. याबद्दल समाधान व्यक्‍त केळे जात असले, तरी लाखो लिटर पाणी नाले-गटारात वाहून जात असल्याने सर्वसामान्य नागरिक व नगरसेवकांकडून मात्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. महानगरपालिका आयुक्‍त प्रशासनाने तलावाची खोली वाढवून उंच भिंत उभारून पाण्याची साठवणूक केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल यासाठी आयुक्तांनी तात्काळ पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे उपमहापौर मनोज काटेकर, ज्येष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी यांनी केली आहे.

भिवंडी शहरातील कामतघर परिसरात नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त वऱ्हाळादेवी तलाव असून, तो पाण्याने तुडुंब भरून  वाहू लागला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचून नुकसान झाले आहे. असे असले तरी वऱ्हाळादेवी तलाव तुडुंब भरल्याने आता लाखो रहिवाशांना भेडसावणारा पाणीकपातीचा प्रश्‍न सुटणार आहे. वऱ्हाळादेवी तलावातून जुनी भिवंडी शहराला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दररोज दोन एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, वाया जाणाऱ्या पाण्याबाबत पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें