CCTV Video : भिवंडीत कॅशियरकडूनच बारमधील गल्ल्यावर डल्ला, एक लाख लांबवले; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Jun 21, 2022 | 5:24 PM

रविवारी बारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मद्यपी दारू पिऊन गेल्यानंतर रात्री बारमध्ये धंद्याची मोठी रक्कम गल्ल्यात जमा झाली होती. ही रक्कम पाहून अरविंदकुमारला लालच आली. त्याने मध्यरात्री दोनच्या सुमारास गल्ल्यातील रक्कम घेऊन पोबारा केला.

CCTV Video : भिवंडीत कॅशियरकडूनच बारमधील गल्ल्यावर डल्ला, एक लाख लांबवले; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
भिवंडीत कॅशियरकडूनच बारमधील गल्ल्यावर डल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

भिवंडी : बार कॅशियरनेच गल्ल्यावर डल्ला मारल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मालकाने दाखवलेल्या विश्वासाला हरताळ फासत गल्ल्यातील 1 लाख 3 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी (Theft) करून डल्ला मारला आहे. दरम्यान बारच्या गल्ल्यातील पैसे चोरीची ही घटना बारमधील सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाली आहे. अरविंदकुमार मोतीलाल गुप्ता असे चोरी करणाऱ्या कॅशियर (Cashier)चे नाव आहे. चोरी केल्यानंतर अरविंदकुमारने पोबारा केला आहे. याप्रकरणी बार व्यवस्थापक रोहित मेहता यांनी शहर पोलीस ठाण्यात कॅशियरविरोधात तक्रार दाखल केली आहे.

चोरी करुन कॅशियरचा पोबारा

भिवंडी शहरातील कल्याण नाका येथे आम्रपाली बार अँड रेस्टोरंट आहे. या बारमध्ये अरविंदकुमार मोतीलाल गुप्ता (22) हा कॅशियर म्हणून नोकरी करत होता. अरविंदकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील रहिवासी आहे. कामानिमित्त तो भिवंडीत राहतो. रविवारी बारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मद्यपी दारू पिऊन गेल्यानंतर रात्री बारमध्ये धंद्याची मोठी रक्कम गल्ल्यात जमा झाली होती. ही रक्कम पाहून अरविंदकुमारला लालच आली. त्याने मध्यरात्री दोनच्या सुमारास गल्ल्यातील रक्कम घेऊन पोबारा केला. चोरीची बाब लक्षात येताच बारमधील व्यवस्थापक रोहीत संतोष मेहता यांनी शहर पोलीस ठाण्यात कॅशियर विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

सिंधुदुर्गात मोबाईलची दुकाने फोडली

सिंधुदुर्गात चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नसून आज कणकवलीत पुन्हा चोरी झाली आहे. चोरट्यांनी रात्री भर चौकात असलेल्या मोबाईल रिपेरिंगची दोन दुकाने फोडली. सामान अस्ताव्यस्त करून रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. परवाच चोरट्यांनी कणकवली वागदे येथील घरे फोडली होती तर पिसेकामते येथील मंदिर फोडून देणगी पेटीतील रक्कम पळवली होती. पोलीस यंत्रणा ही चोऱ्यांवर आळा घालण्यास असमर्थ ठरत आहे. (The cashier stole Rs 1 lakh from a bar in Bhiwandi)