Kalyan Crime: कल्याणमधील ‘त्या’ जखमी महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू, मुलावर खूनाचा गुन्हा दाखल

Kalyan Crime: कल्याणमधील 'त्या' जखमी महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू, मुलावर खूनाचा गुन्हा दाखल
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या

प्रमोद आणि त्यांचा मुलगा लोकेश यांच्यात सतत वाद होत असत. असाच वाद त्यांच्यात 10 डिसेंबर रोजी झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत वडिलांची हत्या केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 22, 2021 | 1:08 AM

कल्याण : कल्याणच्या चिकनघर परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेचा अखेर उपाचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिच्या जखमी मुलावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरगुती वादातून मुलाने वडिलांवर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली होती. यावेळी मध्ये पडलेल्या आईवरही त्याने हल्ला करुन जखमी केले होते. तसेच स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने स्वतःलाही जखमी केले होते. यानंतर त्याने वडिलांनी आई व आपल्यावर हल्ला करुन स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव मुलाने केला होता.

पोलिसांनी जखमी आई व मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आईचा जबाब घेतला असता मुलाने हे सर्व घडवल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मुलावर वडिलांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला होता. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर जखमी आईचाही शनिवारी मृत्यू झाल्याने आता महात्मा फुले पोलिसांनी आईच्या खुनाचा गुन्हा मुलगा लोकेश याच्यावर दाखल केला आहे.

10 डिसेंबर रोजी कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीत घडली होती घटना

कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात एका हाय प्रोफाईल इमारतीत प्रमोद बनोरिया हे निवृत्त मोटरमन आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत होते. प्रमोद आणि त्यांचा मुलगा लोकेश यांच्यात सतत वाद होत असत. असाच वाद त्यांच्यात 10 डिसेंबर रोजी झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत वडिलांची हत्या केली. यावेळी प्रमोद यांच्या पत्नी कुसुम त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडल्या असता लोकेशने त्यांच्यावरही चाकून 8-10 वार केले होते. या हल्ल्यात कुसुम गंभीर जखमी झाल्या होत्या.

स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकेशने स्वतःला जखमी केले आणि वडिलांनीच आपल्यावर हल्ला केल्याचा बनाव केला होता. लोकेशने सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला अॅम्बुलन्सला बोलावण्यास सांगितल्याने त्याला संशय आला. सुरक्षारक्षकाने सोसायटीतील लोकांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार सोसायटीतील लोक बनोरिया यांच्या घरी आले असता त्यांना घरातील सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. लोकांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रमोद बनोरिया यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच कुसुम आणि लोकेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (The injured woman from Kalyan died during treatment)

इतर बातम्या

Jaipur Crime: विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी दिल्लीहून जयपूरला आलेल्या प्रियकराला चाकूने भोसकले

Anil Deshmukh: चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना ठोठावला 50 हजार रुपयांचा दंड, मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करण्याचे आदेश

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें