पोहण्यासाठी पाण्यात उडी, एक जण चिखलात रुतला, दुसऱ्याला चक्कर, तिसराही बुडाला, तिघांचा मृत्यू

| Updated on: Jun 20, 2021 | 10:15 PM

ठाण्यामध्ये दिवसभरात तीन जणांचा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे (Three youths drown in water in Thane).

पोहण्यासाठी पाण्यात उडी, एक जण चिखलात रुतला, दुसऱ्याला चक्कर, तिसराही बुडाला, तिघांचा मृत्यू
पोहण्यासाठी पाण्यात उडी, एक जण चिखलात रुतला, दुसऱ्याला चक्कर, तिसराही बुडाला, तिघांचा मृत्यू
Follow us on

ठाणे : ठाण्यामध्ये दिवसभरात तीन जणांचा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांचा मृत्यू एकाच ठिकाणी येऊर इथे असलेल्या तलावात झाला. तर एकाचा मृत्यू लोकमान्य नगर परिसरात झाला. या तीन मृत्यूच्या घटनांमुळे ठाणे शहर हादरलं आहे. पहिली घटना ही सकळच्या सुमारास निल तलावात घडली. 16 वर्षीय युवकाला चक्कर आली आणि तो तलावात पडला. त्याच्यासोबत आणखी एक तरुण त्याच तलावात पडला. त्याचा मृतदहे संध्याकाळी उशिरा अग्निशमन दलाच्या जवानांना तलावात सापडला. तर तिसरी घटना ही लोकमान्य परिसरात घडली. एक 33 वर्षीय तरुण हा पोहोयला गेला असता त्याचा चिखलात पाय रुतला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला (Three youths drown in water in Thane).

पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू

ठाण्यातील येऊरमधील पाटोना पाडा येथे असणाऱ्या नील तलावमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर अजून एक बेपत्ता असल्याची  घटना समोर आली होती. बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध घेण्याच काम अग्निशनम दल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी करत होते. पण संध्याकाळी उशिरा त्याचादेखील मृतदेह जवानांच्या हाती लागला आहे (Three youths drown in water in Thane).

रविवारी (20 जून) सकाळी सातच्या सुमारास  सहा मित्र येऊर येथील पाटोनापाडा येथे असणाऱ्या निल तलावात पोहण्यासाठी गेले होते. यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास प्रसाद पावसकर नावाच्या मुलाच्या डोक्याला पाण्यातील दगड लागल्याने त्याला चक्कर आली आणि तो पाण्यात पडला. मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला बाहेर काढले. पण त्याला पुन्हा चक्कर आल्याने तो पुन्हा पाण्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि ठाणे वर्तक नगर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पण आणखी एक मुलगा बेपत्ता होता. त्याचाही मृतदेह संध्याकाळी उशिरा सापडला. पण त्याचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही.

चिखलात रुतून तरुणाचा मृत्यू

ही घटना ताजी असताना लोकमान्य नगर येथील पाडा नंबर 4 परिसरातील मिलिटरी ग्राउंडमध्ये आणखी एक घटना घडली. या ठिकाणी एका मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात 33 वर्षीय सुरेश करावडे नावाचा तरुण पोहण्यासाठी गेला. मात्र पोहताना तरुणाता पाय चिखलात अडकला. त्यामुळे तो पाण्याबाहेर येऊ शकला नाही आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : ठाण्यात कारमध्ये मृतदेह, मृतकाच्या गळ्यावर जखमा, पोलीस गूढ कसं उलगडणार?