ठाण्यात कारमध्ये मृतदेह, मृतकाच्या गळ्यावर जखमा, पोलीस गूढ कसं उलगडणार?

गणेश थोरात

गणेश थोरात | Edited By: चेतन पाटील, Tv9 मराठी

Updated on: Jun 20, 2021 | 8:09 PM

ठाण्यात एका कारमध्ये मृतदेह आढळला आहे. ठाण्याच्या टिकुजिनी वाडी परिसरात संबंधित कार सापडली आहे (Ola Driver dead body found in car at Thane).

ठाण्यात कारमध्ये मृतदेह, मृतकाच्या गळ्यावर जखमा, पोलीस गूढ कसं उलगडणार?
रस्त्याच्या कडेला बराचवेळ गाडी उभी, बघितलं तर ड्रायव्हर निपचित, गळ्यावर जखमा, हत्या की आणखी काही?

ठाणे : ठाण्यात एका कारमध्ये मृतदेह आढळला आहे. ठाण्याच्या टिकुजिनी वाडी परिसरात संबंधित कार सापडली आहे. हा कारच्या ड्रायव्हर सीटवरच मृतदेह आढळला आहे. संबंधित कार ही ओला-उबेर कंपनीत ट्रान्सपोर्टसाठी असून मृतदेह हा ओला-उबेर ड्रायव्हरचा असल्याची ओळख पटली आहे. टिकुजिनी वाडीत रस्त्याच्याकडेला ही कार उभी होती. परिसरातील नागरिकांना गाडीत मृतदेह दिसला. एका पाठोपाठ अनेकजण घटनास्थळी दाखल झाले. त्यापैकी काही जणांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ही घटना समोर आली (Ola Driver dead body found in car at Thane).

पोलीस घटनास्थळी दाखल

ठाण्याच्या मानपाडा चितळसर पोलिसांना संबंधित घटनेची माहिती ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक लॅबची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला. मृतदेह बाहेर काढला. मृतक ड्रायव्हरच्या गळ्यावर जखम दिसली. याशिवाय गाडीच्या ड्रायव्हर सीटवर रक्ताचे डाग आढळले आहेत. त्यामुळे ड्रायव्हरची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पण या प्रकरणावर पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली नाही (Ola Driver dead body found in car at Thane).

मृतकाची ओळख पटली

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात मृतकाचे नाव सुनील आस्थाना असल्याचं समोर आलं आहे. मृतक सुनील हे 46 वर्षांचे होते. ते ओला-उबेर ड्रायव्हर होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

आकस्मित मृत्यूची नोंद

याप्रकरणी मानपाडा चितळसर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केलेली आहे. मात्र गाडीतील रक्ताच्या नमुन्यावरून पुढील तपास पोलीस करीत आहे. अजूनही या मृत्यूचे गुढ उलगडले नाही. सुनील अस्थाना यांची हत्या झाली असावी असे मृतदेहावरून दिसून येते. पोलिसांचा तपास सुरू असून त्यांनी यावर बोलणे टाळले आहे.

हेही वाचा : प्रत्येक मुलीला प्रति ग्राहक 1500 रुपये, ग्राहक सांगतिल तिथे मुली पोहोचवायचे, मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI