AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक मुलीला प्रति ग्राहक 1500 रुपये, ग्राहक सांगतिल तिथे मुली पोहोचवायचे, मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नोएडा पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग यूनिटने (HHTU) देहविक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे (Noida Police busted online sex racket)

प्रत्येक मुलीला प्रति ग्राहक 1500 रुपये, ग्राहक सांगतिल तिथे मुली पोहोचवायचे, मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मुंबईत 'सेक्स टुरिझम रॅकेट'चा धक्कादायक प्रकार उघडकीस
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 6:27 PM
Share

नवी दिल्ली : नोएडा पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग यूनिटने (HHTU) देहविक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा खुलासा झाला आहे. आरोपी ऑनलाईन ग्राहकांशी कसा संवाद साधायचे यापासून ते मुलींना ग्राहक सांगेल त्याठिकाणी पोहोचवण्यापर्यंतची सविस्तर माहिती आता पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी संबंधित टोळीतील दोघांना सध्या अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत भरपूर माहिती मिळण्याची आशा आहे. या आरोपींनी आतापर्यंत सांगितलेल्या माहितीनुसार पोलीस अनेक ठिकाणी छापा टाकत आहेत (Noida Police busted online sex racket).

आरोपी कसं काम करायचे?

संबंधित आरोपी सर्वात आधी व्हाट्सअ‍ॅप नंबरच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधायचे. त्यांच्याशी बातचित करायचे. त्यानंतर एकदा करार झाला की मुलींना हॉटेल, घरी, फ्लॅट असं हवं तिथे पाठवायचे. यासाठी ग्राहकांकडून चिक्कार पैसे देखील घेतले जायचे. याशिवाय सर्व पैसे रोख घेतले जायचे. ही किंमत जवळपास 5 हजार ते 20 हजारपर्यंत असायची. तर मुलींना 1500 रुपये प्रतिग्राहकच्या हिशोबाने पैसे दिले जायचे. ही सर्व माहिती पोलिसांना आरोपींना पकडल्यानंतर मिळाली (Noida Police busted online sex racket).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

नोएडा पोलिसांच्या एएचटीयू पथकाला देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या पथका संबंधित पुसटशी माहिती मिळाली. पोलिसांच्या हाथी आरोपींचा व्हाट्सअ‍ॅपनंबर लागला. पोलिसांनी त्यामार्फत आरोपींसोबत संपर्क करण्यास सुरु केला. पोलिसांनी त्यानंतर सापळा रचला. पोलिसांनी खोटा ग्राहक बनून आरोपींसोबत डील केलं. पोलिसांनी आरोपींना एका गेस्ट हाऊसच्या बाहेर मुलींना घेऊन येण्यास सांगितलं. त्यांनी दोन मुलींची बुकिंग केली होती.

आरोपी डील झाल्यानुसार एका कारमध्ये दोन मुलींना घेऊन आले. तिथे पोलीस सिव्हील ड्रेसमध्ये होते. पोलिसांनी आधीपासूनच तयारी केली होती. त्यांनी स्टिंग ऑपरेशन करुन आरोपींकडून सर्व वधवून घेतलं. त्यानंतर दोघांना बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपी मुलींसोबत कारमधूनच आले होते.

हेही वाचा : सना हीच सीमा होती, चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या दोघांना बघून पोलीस चक्रावले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.