Thane Rain: ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त थोडक्यात बचावले; कारवरच कोसळले झाड; कोणतीही जीवितहानी नाही

वादळीवाऱ्यासह पावसाचे प्रमाण वाढले होते, पावसाच्या पाण्याची पाहणी करताना त्यांनी लावलेली कारवर अचानक झाड कोसळले, यामध्ये त्यांच्या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यावेळी त्यांचे चालकही कारच्या बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.

Thane Rain: ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त थोडक्यात बचावले; कारवरच कोसळले झाड; कोणतीही जीवितहानी नाही
ठाण्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कारवरच झाड कोसळलेImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 3:49 PM

ठाणेः मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचे (Mumbai Rain) प्रमाण वाढल्याने नागरिकांचे जीवन विस्कळती झाले आहे. अनेक भागात वाहतूक व्यवस्था कोलमडली असून रस्त्यावर पाणी आले आहे. ठाणे परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने ठाण्यातील लुईसवाडी (Thane Luiswadi) परिसरात अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी दौरा काढण्यात आला होता. त्यावेळी लुईसवाडी परिसरातील पाहणी करत असताना एका ठिकाणी कार लावून परिसराची पाहणी करताना तेथील झाड अतिरिक्त आयुक्तांच्या कारवर झाड कोसळल्याने (tree collapsed on the car) कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त पाहणी करत असताना ही घटना घडल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. यावेळी त्यांचे चालकही त्यांच्यासोबत बाहेर असल्याने या दुर्घटनेत कोणताही अनर्थ घडला नाही.

लुईसवाडी परिसराची पाहणी करताना दुर्घटना

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसांने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या ज्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्या परिसरांची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ठाण्यातही पावासाचा जोर वाढल्याने ठाणे महानगरपालिकचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी पाहणी करण्यासाठी लुईसवाडी परिसरात गेले होते.

कारवर झाड कोसळले

त्यावेळीही वादळीवाऱ्यासह पावसाचे प्रमाण वाढले होते, पावसाच्या पाण्याची पाहणी करताना त्यांनी लावलेली कारवर अचानक झाड कोसळले, यामध्ये त्यांच्या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यावेळी त्यांचे चालकही कारच्या बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.

जनजीवन विस्कळीत

ठाणे परिसरात कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक परिसरात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून पाहणी करण्यात येत आहे. आजही महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याकडून पाहणी करत असतानाच त्यांच्या कारवर झाड कोसळले.

कारसह दुचाकींचेही नुकसान

यावेळी त्यांच्या कारवर जे झाड कोसलळे आहे, त्याच झाडामुळे इतर दोन दुचाकींचेही नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका उभी करण्यात आलेल्या वाहनांना बसला आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.