‘अजित पवारांना ताप की मनस्ताप?’, मुंब्र्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंचं अजित पवारांवर मिश्किल उत्तर

"मी स्वत: एवढ्यासाठी आलो होतो की, या गद्दारांना सत्तेचा माज आलेला आहे. यांच्याकडे निभ्रट, गद्दार, चोर आणि नामर्द आहेत. सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करत आहेत. जिथे 20-25 वर्षांपासून शिवसेनेची शाखा होती ती त्यांनी बुलडोझर लावून पाडली. खोके सरकारने तर स्वत:चा एक खोका, एक डबडं तिथे आणून ठेवलं आहे. पण तो खोका आम्ही तिथे राहू देणार नाहीत", असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.

'अजित पवारांना ताप की मनस्ताप?', मुंब्र्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंचं अजित पवारांवर मिश्किल उत्तर
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 8:13 PM

ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंब्रा शहराच्या दौऱ्यावर आले. ठाकरे गटाची शाखा गेल्या आठवड्यात अनधिकृत बांधमाकाचे आरोप करुन पाडण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे त्या शाखेची पाहणी करण्यासाठी गेले. यावेळी मुंब्रा शहराला छावणीचं स्वरुप आलेलं बघायला मिळाले. शिंदे गटाचे कार्यकर्ते अगोदरपासूनच शाखेच्या जवळच शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष शाखेच्या ठिकाणी जाऊ दिलं नाही. अखेर शाखेपासून 10 मीटर लांबून उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष शाखेजवळ पाहणी न करता परतावं लागलं. यानंतर त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरेंना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. “सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याची मुदत या लवादला दिलेली आहे. त्यामुळे त्यांना 31 डिसेंबरला निर्णय द्यावाच लागेल. तो काही दिला तरीही किंवा नाही दिला तरीही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझ्या अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देईल आणि तो न्याय देईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘त्यांना नेमका कसला ताप…’

यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “माझा आता अजित दादांशी काही संपर्क नाही. त्यांना नेमका कसला ताप आहे, सहकाऱ्यांचा ताप की मनस्ताप, म्हणजे ताप आहे की मनस्ताप हे त्यांना माहिती, मला माहिती नाही. मी त्यावर बोलण्यासाठी नंतर परत येईन”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

“पोलिसांची हतबलता देशाने पाहिली आहे. मी पोलिसांना दोष देत नाही. पण सरकार म्हणून जो कारभार सुरु आहे, याच सरकारने याच पोलिसांवर लाठीमार करायला लावला होता. याच सरकारने शांततेचं चालू असणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांना लाठी हल्ला करायला लावला होता. याच सरकारने त्याच पोलिसांना चोरांचं रक्षण करायला लावलं. मी पोलिसांची मानसिकता काय झाली असेल ते समजू शकतो. पोलिसांवर अशी नामुष्की कधी आली नसेल”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

“मी स्वत: एवढ्यासाठी आलो होतो की, या गद्दारांना सत्तेचा माज आलेला आहे. यांच्याकडे निभ्रट, गद्दार, चोर आणि नामर्द आहेत. सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करत आहेत. जिथे 20-25 वर्षांपासून शिवसेनेची शाखा होती ती त्यांनी बुलडोझर लावून पाडली. खोके सरकारने तर स्वत:चा एक खोका, एक डबडं तिथे आणून ठेवलं आहे. पण तो खोका आम्ही तिथे राहू देणार नाहीत. आम्ही प्रशासनाला सुद्धा ताकीद देत आहोत कारण आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“हे असे दिवसाढवळ्या घुसखोरी करतील तर त्यांच्यावर घुसखोरीची केस करायला हवी. हे कार्यालय महापालिकेने पाडलंय का? जरी पाडलं असेल तर त्यांनी आधी नोटीस देणं बंधनकारक होतं. शाखा अनधिकृत असेल तर आमच्याकडे 25 वर्षांपासून टॅक्स वगैरे भरल्याची कागदपत्रे आहेत”, अशी भूमिका ठाकरेंनी मांडली.

“उद्यापासून शिवसेनेची शाखा असेल. शिवसेना ही एकच आहे. निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार आहे. पक्षाचं नाव कुणाला देण्याचा अधिकार नाही. मूळ शिवसेना ही आमचीच आहे. मी पोलीस, महापालिकेला नम्रपणाने सांगू इच्छितो, एकतर तुम्ही बाजूला व्हा, आम्ही बघतो त्यांचं काय करायचं ते. ते थोड्या काळासाठी राजकारणात राहतील. मग नंतर काय करतील? त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का आहे. त्यांच्यावर चोर म्हणून लागलेला शिक्का आहे”, अशी टीका ठाकरेंनी केली.

“आम्ही आज संयम दाखवला आहे. बॅरिकेट्स तोडून आम्ही जाऊ शकलो असतो. पण ऐन दिवाळीत गुंडागर्दी नको म्हणून मी स्वत: संयम बाळगला. मी एक-दोन दिवसांआधी तिथे येणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर सरकारचं काम होतं की त्यांच्या भाडोतरी गुंडाना तिथे येऊ द्यायला नको होतं. बरं येऊ दिलं आणि त्यांना पोलीस संरक्षण दिलं. ज्यांचं आकलेचं दिवाळ निघालेलं आहे, त्यांच्यामुळे महाराष्ट्राची दिवाळी वाईट होऊ नये यासाठी आम्ही संयम बाळगलेला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“गद्दारांना धडा शिकवा हा आमच्या आनंद दिघे यांचा गुरुमंत्र आहे. ठाणेकरांनी हा गुरुमंत्र जोपासला आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये गद्दारी चालणारच नाही. मी ठाण्यात सभा घेणार आहे. डिसेंबर किंवा जानेवारीत ठाण्यात सभा घेणार आहे. महाविकास आघाडीची सभा घेऊच, जिथे-जिथे या चोरांची गुंडागर्दी होईल, तिथे उभं राहा”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' गंभीर आरोपावर शरद पवार गटाचा पलटवार
देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' गंभीर आरोपावर शरद पवार गटाचा पलटवार.
जागावाटपावरून महायुतीत वाद; कदम संतापले, सर्वांना संपवून भाजपला फक्त..
जागावाटपावरून महायुतीत वाद; कदम संतापले, सर्वांना संपवून भाजपला फक्त...
पवार कुटुंब एकाच मंचावर..ताई दादांनी एकमेकांशी बोलणं काय बघणं पण टाळलं
पवार कुटुंब एकाच मंचावर..ताई दादांनी एकमेकांशी बोलणं काय बघणं पण टाळलं.
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण.
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले.
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले.
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका.
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?.
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा.