कल्याणमध्ये चोर-पोलिसाचा थरारक खेळ, कोर्टातून जेलमध्ये नेत असताना ‘तो’ निसटला, पोलिसांना घाम, सराईत चोरट्याला पकडण्याचा थरार

उल्हासनगरमधील सराईत चोर संजू वाघरीने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला होता. त्याला कल्याण कोर्टातून आधारवाडी जेलला नेलं जात असताना त्याने गाडीतून पळ काढत धूम ठोकली होती. पोलिसांनी पाच तासांच्या तपासानंतर उल्हासनगर ओटी सेक्शनमध्ये त्याला पुन्हा अटक केली.

कल्याणमध्ये चोर-पोलिसाचा थरारक खेळ, कोर्टातून जेलमध्ये नेत असताना 'तो' निसटला, पोलिसांना घाम, सराईत चोरट्याला पकडण्याचा थरार
कल्याणमध्ये चोर-पोलिसाचा थरारक खेळ, कोर्टातून जेलमध्ये नेत असताना 'तो' निसटला, पोलिसांना घाम, सराईत चोरट्याला पकडण्याचा थरार
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 6:58 PM

विठ्ठलवाडी पोलिसांनी संजू वाघरी या सराईत चोरट्याला अटक केली. त्याला कल्याण कोर्टात हजर केलं. त्यानंतर त्याला आधारवाडी जेलमध्ये नेत असताना या चोरट्याने पोलिसांच्या गाडीतून चकवा देत पळ काढला. या चोरट्याचा शोधासाठी पोलिसांनी प्रयत्नशी शिकस्त केली. कानाकोपऱ्यात त्याचा शोध सुरू केला. अखेर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला उल्हासनगर ओटी सेक्शन येथून बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. संजू पसार होताच पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली होती. मात्र पाच तासाच्या प्रयत्नानंतर संजूला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. पण त्यामुळे पोलिसांचा जीव मात्र भांड्यात पडला.

उल्हासनगर सेंटर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चोरीचा प्रकरणात संजू वाघरी या चोरट्याला उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी संजू वाघरी या चोरट्याचा ताबा घेतला होता. विठ्ठलवाडी पोलिसांनी संजू वाघरी याला कल्याण न्यायालयात हजर केलं. त्यानंतर पोलीस त्यांच्या गाडीतून संजू याला आधारवाडी कारागृहात घेऊन जात होते. याच दरम्यान निक्की नगर परिसरात पोलिसांची गाडी स्लो झाली. याचा फायदा घेत संजू वाघेरी याने पोलिसांना चकवा देत गाडीतून बाहेर पळ काढला.

पोलिसांनी आरोपींचा शोध कसा घेतला?

पोलिसांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी या चोरट्याचा पाठलाग केला. मात्र हा चोरटा जवळच असलेल्यावर टॅक्स या इमारती समोरील मोकळ्या मैदानात झाडाझुडपांचा आसरा घेत गायब झाला. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे पाच तासापासून या चोरट्याचा शोध सुरू होता. चोरट्याचा माग काढता काढता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.

हे सुद्धा वाचा

पोलिसांची विविध पथके संधीच्या शोधासाठी तैनात करण्यात आली. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाच्या गस्त सुरू असताना उल्हासनगर ओटी सेक्शन भीम नगर परिसरात संजू आढळला. या पथकाने तत्काळ संजूला ताब्यात घेतलं आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला. संजू वाघरी याला खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....