AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-भाजप मुद्द्यावरुन गुद्द्यावर, भाजप नगरसेवकाला मारहाण, तोंडाला काळंही फासलं!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आलं आहे. राणे यांच्याविरोधात संपूर्ण राज्यभरात असंतोषाचं वातावरण असताना उल्हासनगरात मोठी घटना घडली आहे. नारायण राणे यांना अटक झालेली असताना शिवसेनेविरोधात बोलणाऱ्या भाजपा नगरसेवकाला शिवसैनिकांनी थेट काळं फासत मारहाण केली आहे.

शिवसेना-भाजप मुद्द्यावरुन गुद्द्यावर, भाजप नगरसेवकाला मारहाण, तोंडाला काळंही फासलं!
ULHASNAGAR BJP AND SHIVSENA
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 5:49 PM
Share

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आलं आहे. राणे यांच्याविरोधात संपूर्ण राज्यभरात असंतोषाचं वातावरण असताना उल्हासनगरात मोठी घटना घडली आहे. नारायण राणे यांना अटक झालेली असताना शिवसेनेविरोधात बोलणाऱ्या भाजपा नगरसेवकाला शिवसैनिकांनी थेट काळं फासत मारहाण केली आहे. या घटनेनंतर उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रदीप रामचंदानी (Pradeep Ramchandani) असं मारहाण झालेल्या भाजपा नगरसेवकाचं नाव आहे. ते उल्हासनगर महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य आहेत. (Ulhasnagar Thane BJP corporator Pradeep Ramchandani directly beaten by Shivsena activist shivsena said it is answer to Narayan Rane and his supporters)

भाजप नगरसेवकावर 10 जणांचा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार रामचंदानी हे आज (24 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास उल्हासनगर महानगरपालिकेच्या बाहेर आले होते. यावेळी अचानक 8 ते 10 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांना खाली पाडून मारहाण केली. या मारहाणीनंतर रामचंदानी यांच्या तोंडाला काळं फासलं. मारहाण करण्यासाठी आलेले कार्यकर्ते गळ्यात शिवसेनेचे मफलर घालून आल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये हा सर्व घटनाक्रम स्पष्टपणे दिसतोय.

शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलंय

या घटनेनंतर आपण शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रारी केल्यामुळे त्यांनी दडपशाही करण्यासाठी आपल्याला मारहाण केल्याचा भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केलाय. तर महाराष्ट्रात शिवसेनेचं तालिबानी राज्य असल्याची टीकाही रामचंदानी यांनी केलीय. या घटनेनंतर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना विचारलं असता, त्यांनी प्रदीप रामचंदानी हे सातत्याने शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या विरोधात बोलत असतात. त्यामुळेच शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिलंय, असं राजेंद्र चौधरी यांनी सांगितलं.

राणे यांच्या पिलावळीला धडा शिकवण्याचं काम

हा हल्ला शिवसैनिकांनीच केल्याचं चौधरी त्यांनी मान्य केलं. या घटनेमुळे उल्हासनगर शहरातील राजकीय वातावरण तापलं असून राणे यांच्या पिलावळीला धडा शिकवण्याचं काम शिवसैनिकांनी केल्याचंसुद्धा शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

VIDEO : नारायण राणे यांना खरंच जेवणाच्या ताटवरुन उठवलं का? UNCUT व्हिडीओ पाहा!

Video: राणेंना भरल्या ताटावरुन पोलीसांनी उठवलं? निलेश राणे पोलीसांवर भडकले, नेमकं काय घडलं त्यावेळी?

शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे नवे हिंदूत्त्व आणि नवा महाराष्ट्र !!! देवेंद्र फडणवीसांचा आरोप

(Ulhasnagar Thane BJP corporator Pradeep Ramchandani directly beaten by Shivsena activist shivsena said it is answer to Narayan Rane and his supporters

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.