पायाला पीळ मारण्याचा प्रयत्न, वसईत अग्निशमन दलाच्या जवानांकडून साडेसात फुटी अजगराची सुटका

वसईत रस्त्याशेजारी नाल्याच्या कोपऱ्या सापडलेला अजगर साडेसात फूट लांब आणि 15 किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे. Vasai Ajgar Python rescue

पायाला पीळ मारण्याचा प्रयत्न, वसईत अग्निशमन दलाच्या जवानांकडून साडेसात फुटी अजगराची सुटका
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 9:17 AM

वसई : धारावीतील घरात अजगर सापडल्याची घटना ताजी असतानाच वसईतही साडेसात फूटी अजगर आढळला. केवले गावातील रस्त्याशेजारी नाल्याच्या कोपऱ्यात हा अजगर लपून बसला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसाने अजगराला बाहेर काढत गोणीत भरलं. सुटका करताना अजगराने जवानांच्या पायाला पीळ मारण्याचा प्रयत्न केला. (Vasai Ajgar Python rescue by Fire Brigade)

नाल्याजवळ अजगर लपल्याचं स्थानिक नागरिकांच्या आधी लक्षात आलं. त्यांनी तात्काळ वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केलं. हा अजगर साडेसात फूट लांब आणि 15 किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे.

अजगाराने अनेक वेळा अग्निशमन दलाच्या जवानांच्या हाताला, पायाला पीळ मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण मोठ्या धाडसाने जवानांनी अजगराला पकडून गोणीत भरले आहे. अजगराला वसईतील अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयात नेऊन वन विभागाच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले आहे.

धारावीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला अजगर सापडला

धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे राहणाऱ्या रहिवाशाच्या घरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला अजगर शिरला होता. पहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या कौलात हा सहा फूट लांबीचा अजगर शिरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

अजगर आल्याचं समजताच मुंबई पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दलात काम करणाऱ्या मुरलीधर जाधव या शिपायाने जीवाची बाजी लावत अजगराची सुटका केली. मुरलीधर जाधवांनी अगदी सहजरित्या अजगराला घरातून बाहेर काढलं आणि त्याची सुरक्षित सुटका केली. मुरलीधर जाधव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे.

अजगर घरात शिरल्यामुळे रात्रीच्या वेळी धारावीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अजगराला पकडताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. ‘मुंबई पोलीस जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अजगराचे फोटो-व्हिडीओ, मुरलीधर जाधवांना शेकहँड करण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली. मात्र पोलिसांना गर्दीला पांगवलं.

संबंधित बातम्या : 

मुंबईतील वांद्रे परिसरात 24 तासात दोन अजगर सापडले!

धारावीतील घरात अजगराची एन्ट्री, जांबाज पोलिस शिपायाकडून थरारक सुटका

(Vasai Ajgar Python rescue by Fire Brigade)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.