महिलांच्या सुरक्षेसाठी कल्याण-डोंबिवलीत ग्रामपंचायत लेव्हलवर सुरक्षा व्यवस्था निर्माण करा; विद्यार्थी भारतीची मागणी

डोंबिवलीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थी भारती या संघटनेनेही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. (vidyarthi bharti agitation in kalyan against gang rape)

महिलांच्या सुरक्षेसाठी कल्याण-डोंबिवलीत ग्रामपंचायत लेव्हलवर सुरक्षा व्यवस्था निर्माण करा; विद्यार्थी भारतीची मागणी
vidyarthi bharti

डोंबिवली: डोंबिवलीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थी भारती या संघटनेनेही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. विद्यार्थी भारती संघटनेने आज पोलिसांना निवेदन दिलं असून महिलांच्या सुरक्षेसाठी कल्याण आणि डोंबिवलीत ग्रामपंचायत लेव्हलवर सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. (vidyarthi bharti agitation in kalyan against gang rape)

देशात अनेक ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सुद्धा दिवसेंदिवस बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. डोंबिवलीत भोपर गावात एका 15 वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात एकूण 30 गुन्हेगार सामील आहेत. त्यामुळे या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी विद्यार्थी भारतीने मानपाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे. संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मुधाने यांनी हे निवेदन दिलं आहे.

तहसील कार्यालयासमोर निदर्शने

विद्यार्थी भारतीने आज सकाळी 11.30 वाजता कल्याण पश्चिमेला तहसीलदार कार्यालयासमोरही निषेध आंदोलन केलं. तसेच कल्याण, डोंबिवलीत ठिकठिकामी कौन्सिलिंग सेंटर उभे करण्याची मागणीही केली. बलात्कारासारख्या घटना थांबवण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे, असं आवाहन विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले.

कौन्सिलिंग सेंटर उभारा

डोंबिवलीतील ही घटना प्रचंड लाजिरवाणी असून ग्रामपंचायत लेव्हलवर गाव पातळीवर महिलांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था उभारायला हवी. तसेच तसेच या महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी कौन्सिलिंग सेटंर उभरेल गेले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. माजी नगरसेवक व कल्याण विकासिनीचे अध्यक्ष अॅड. उदय रसाळ यांनीही या मागणीचे समर्थन केलं.

आणखी दोघे जेरबंद

दरम्यान, या घटनेप्रकरणी कालपर्यंत 26 जणांना पोलिसांनी अटक केली होती. आज आणखी दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 28 वर गेली आहे. यामधील आरोपी नवी मुंबई, डोंबिवली येथे राहणारे असल्याची माहिती एसपी सोनाली ढोले यांनी दिली. प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेक जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

घटना ऐकून पोलीसही हैराण

या घटनेमुळे डोंबिवली ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले.

आरोपींचा पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार

जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडीओच्या आधारे आतापर्यंत 33 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. (vidyarthi bharti agitation in kalyan against gang rape)

 

संबंधित बातम्या:

अवघ्या 15 वर्षाच्या मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार

डोंबिवलीची घटना ताजी असताना कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना

बॉयफ्रेण्डकडून बलात्काराचं व्हिडीओ शूट, 14 वर्षीय मुलीवर 31 जणांचा गँगरेप, डोंबिवलीत खळबळ

(vidyarthi bharti agitation in kalyan against gang rape)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI