AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

You Tube Bhai: दबंग भाईची शिवसेनेत एंट्री; त्याच्या एकट्यावर 13 गुन्ह्यांची आहे नोंद, टीकाकारांना संधी

मागील दोन वर्षांपूर्वी अभंगेचे व्हिडीओ डॉन असल्याच्या अंविर्भावात अनेक व्हिडीओ प्रसिद्ध झाले होते. त्याचवेळी त्याला युट्युब भाई असे संबोधलं गेले होते. याच सिद्धू अभंगे वर १३ गुन्ह्यांची नोंद आहे.

You Tube Bhai: दबंग भाईची शिवसेनेत एंट्री; त्याच्या एकट्यावर 13 गुन्ह्यांची आहे नोंद, टीकाकारांना संधी
Youtube Bhai Shivsena
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 07, 2022 | 12:25 AM
Share

ठाणे: ठाणे परिसरातील युट्यूब भाई दबंग भाई (Youtube) म्हणून दहशत पसरवण्याऱ्याला सिद्धू अभंगे या गुंडाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही वर्षांपासून या स्वयंघोषित भाईने जिल्ह्यात ऊत घातला आहे. खंडणी, हत्याचा प्रयत्न, धमकावणे, धारधार हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे (Crime) या गुंडावर आहेत. आता या भाईने चक्क सेनेत (Shivsena) प्रवेश केल्याने शिवसेनेत गुंडांची एन्ट्री होत असल्याची टीका केली जात आहे.

युवासेनेचे वरुण सरदेसाई यांच्या हस्ते अभंगेचा आणि गॅंगचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. प्रत्येक पक्षात स्थानिक गुंडांना राजकीय आश्रय हवा असतो, असाच युट्युब भाई सिद्धू अभंगे याने शिवसेना भवन येथे पक्ष प्रवेश करून घेतला आहे.

सिद्धू अभंगे वर १३ गुन्ह्यांची नोंद

मागील दोन वर्षांपूर्वी अभंगेचे व्हिडीओ डॉन असल्याच्या अंविर्भावात अनेक व्हिडीओ प्रसिद्ध झाले होते. त्याचवेळी त्याला युट्युब भाई असे संबोधलं गेले होते. याच सिद्धू अभंगे वर १३ गुन्ह्यांची नोंद आहे. तर तो ठाणे पोलिसांच्या अभिलेखावरही होता असं सांगितले जात आहे. तर ठाण्यातील टॉप-10 दबंगाच्या रांगेत त्याचा नंबर लागत असल्याने आता त्याच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेच्या विरोधकांना आता टीका करण्यासाठी वाव मिळाला आहे.

गुन्हेगारी कारकीर्द बंद करून

दबंग भाईने शिवसेनेत प्रवेश करुन टीकाकारांना संधी दिली आहे. आता त्याने गुन्हेगारी कारकीर्द बंद करून शिवसेनेत प्रवेश करुन राजकारणात भाग घेणार असल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?