‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ च्या बॅनरची सोशल मीडियावर होतेय चर्चा

पिंपरीत काही दिवसांपूर्वी ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा मजकूर असलेले पोस्टर व्हायरल झाले होते , त्यानंतर ‘शिवडे, आय एम सॉरी’ या लव्हस्टोरीतील ब्रेकअपच्या पोस्टरची खूप चर्चा रंगली होती.

‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो च्या बॅनरची सोशल मीडियावर होतेय चर्चा
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 3:29 PM

पिंपरी- पिंपरी- चिंचवड शहरात ‘शिवडे, आय एम सॉरी’ (SHIVDE I AM SORRY’) शहर भर गाजलेल्या पोस्टर बाजीनंतर आता ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ हे होर्डिंग पिंपरीकर नागरिकांसह प्रवाश्यांचे लक्ष वेधत आहेत. आता या होर्डिंगचे नेमका काय उद्देश आहे याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावरफिरत असलेल्या या होर्डिंगचा नेमका अर्थ काय याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

यापूर्वीची पोस्टरबाजीही ठरली होती चर्चेचा विषय

पिंपरीत काही दिवसांपूर्वी ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा मजकूर असलेले पोस्टर व्हायरल झाले होते , त्यानंतर ‘शिवडे, आय एम सॉरी’ या लव्हस्टोरीतील ब्रेकअपच्या पोस्टरची खूप चर्चा रंगली होती. तर राजकारणातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर नगरसेवक रवी लांडगे यांनीही पक्षांतर्गत कलह उघड केला होता. महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपमधील कलहही लपून राहिला नव्हता. माजी आमदार विलास लांडे यांनी ‘आता हवा पिंपरी चिंचवडला फक्त घड्याळाचा गजर’ हे हे होर्डिंगही  गाजले होते.

आगामी निवडणुका लक्षात घेता हे राजकीय बॅनरबाजी आहे का ? कुणी प्रेमवीराने केलेली बॅनरबाजी आहे हे अद्याप समोर आलेले नाही. या बॅनरचा नेमका अर्थ काय आहे, यावर चर्चा घडत आहेत.

पाकिस्तान दौऱ्यातून कायरन पोलार्डची माघार; वनडे आणि T20 मालिकेत दोन वेगवेगळे कर्णधार

BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक

Girish Kuber | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, नाशकात साहित्य संमेलन परिसरात प्रकार