AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Kuber | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, नाशकात साहित्य संमेलन परिसरात प्रकार

साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेपानंतर शाईफेक करण्यात आली. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Girish Kuber | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, नाशकात साहित्य संमेलन परिसरात प्रकार
गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 3:20 PM
Share

नाशिक : दैनिक लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर शाईफेक (Ink Thrown) करण्यात आली. नाशिकमध्ये सुरु असलेल्या साहित्य संमेलनस्थळी (Nashik Sahitya Sammelan) हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गिरीश कुबेर हे सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याने हा हल्ला केल्याचं संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) सांगण्यात आलं आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

काय आहे वाद?

‘रेनेसान्स स्टेट – द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या गिरीश कुबेर लिखित पुस्तकाच्या प्रकाशनानंतरही वाद झाला होता. या पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप केला जात आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप केला जात आहे. या पुस्तकावर बंदी आणण्याचीही मागणी केली जात आहे.

पाहा व्हिडीओ :

साहित्य संमेलनाचा समारोप

नाशिकमध्ये सुरु असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज (रविवारी) कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे मोठ्या दिमाखात समारोप होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

नारळीकरांची गैरहजेरी

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाला गैरहजर राहिले. त्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यापुढचा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हिंडता-फिरता असला पाहिजे, अशी सूचना कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या :

Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाला हिंडता-फिरता अध्यक्ष असावा; कौतिकराव ठाले-पाटलांच्या सूचना

साहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप; ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची विशेष उपस्थिती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.