BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक' असं म्हणतं एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री प्राजक्ता माळी ही असाच संदर्भ असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक
prajakta mali

मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक’ असं म्हणतं एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री प्राजक्ता माळी ही असाच संदर्भ असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ प्राजक्ता माळी ओठांना लावलेली लिपस्टिकही पुसून बॅन लिपस्टिक असे म्हणताना दिसत आहे. या सोबतच तिने मला लिपस्टिकचा रंग नको… मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!
I Support @tejaswini_pandit #BanLipstick असा हॅशटॅग सुद्धा दिला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच प्रेक्षकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमक काय आहे हे प्रकरण
काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे यांनी बॅन लिपस्टिक असा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी दिग्दर्शक संजय जाधव यांनी कमेंटमध्ये ‘क्या हुआ भाई?’ असा सवाल केला होता. त्यावेळी काही यूजर्स नी हे एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशन असू शकतं असा अंदाज वर्तवला आहे.  बऱ्याच नेटकऱ्यांनी या दोघींनाही लिपस्टिक पुसून टाकायची होती, तर लावलीच कशाला? अशा प्रकारच्या कमेंट्स केलेल्या दिसून येत आहेत. आता हे  प्रकरण नक्की काय आहे हे येत्या काही दिवसातच कळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

काय आहे व्हिडीओमध्ये
या व्हिडीओमध्ये दोघींनीही लावलेली लिपस्टीक पुसून टाकली आहे असे दिसतेय. आणि या व्हिडीओला कॅप्शन देत त्यांनी लिहीले आहे की, लिपस्टिकला माझा विरोध आहे आणि बॅन लिपस्टीक असा हॅशटॅग त्यांनी वापरलेला आहे. तर या व्हिडिओ मागचे नेमकं सत्य काय ? हा त्यांच्या आगामी चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ आहे का? किंवा एखादा पब्लिसिटी स्टंट आहे? यावर सध्या इंस्टाग्रामवर बरीच मोठी चर्चा रंगलेली दिसून येत आहेत.

हेही वाचा :

Video | तंग कपडे घालून प्रीमिअरला पोहचलेली परिणीती Oops Momentची शिकार! आयत्यावेळी अर्जुन कपूर आला मदतीला धावून…

Sweety Biopic | जन्मतः पुरुष, मात्र स्त्री बनून अवघ्या मुंबईला भुलवलं! ‘स्वीटी’ची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर!

Jacqueline Fernandez | 50 लाखांचा घोडा, 9 लाखांची पर्शियन मांजर; सुकेश चंद्रशेखरचं जॅकलिन फर्नांडिसला गिफ्ट


Published On - 3:00 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI