AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sweety Biopic | जन्मतः पुरुष, मात्र स्त्री बनून अवघ्या मुंबईला भुलवलं! ‘स्वीटी’ची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर!

सरत्या वर्षाच्या सुरुवातीला ‘मुंबई सागा’ सारखा धमाकेदार चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर आणि विस्मृतीत गेलेल्या अभिनेता फरदीन खानला ‘विस्फोट’सह बॉलिवूडमध्ये परत आणल्यानंतर आता निर्माता संजय गुप्ता (Sanjay Gupta) एका नव्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.

Sweety Biopic | जन्मतः पुरुष, मात्र स्त्री बनून अवघ्या मुंबईला भुलवलं! ‘स्वीटी’ची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर!
Sanjay Gupta-Dancer Sweety
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 12:05 PM
Share

मुंबई : सरत्या वर्षाच्या सुरुवातीला ‘मुंबई सागा’ सारखा धमाकेदार चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर आणि विस्मृतीत गेलेल्या अभिनेता फरदीन खानला ‘विस्फोट’सह बॉलिवूडमध्ये परत आणल्यानंतर आता निर्माता संजय गुप्ता (Sanjay Gupta) एका नव्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. संजय गुप्ता भारतातील सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय बार डान्सर ‘स्वीटी’वर (Sweety) बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहेत.

1994 मध्ये ‘आतिश: फील द फायर’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे निर्माते-दिग्दर्शक संजय गुप्ता ‘कांटे’, ‘शूटआउट’ सीरीज आणि गुन्हेगारी जगाचे चित्रण करणाऱ्या ‘मुंबई सागा’सारख्या अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखले जातात. पण त्यांचा हा पुढचा चित्रपट वेगळा असणार आहे.

कोण होती स्वीटी?

‘स्वीटी’ जी मूलत: एक पुरुष होती, पण तिने स्त्री बनून सर्वांना भुलवलं. दक्षिण मुंबईतील ‘टोपाझ बार’मध्ये एका महिलेच्या वेषात तिने केलेल्या कामगिरीने जगभरातील रसिकांना आकर्षित केले. 1980 आणि 1990च्या दशकात स्वीटीने शहरातील डान्स बारच्या जगतावर राज्य केले होते. संजय गुप्ता निर्मित करत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘टोपाझ’ (Topaz) ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट समित कक्कड दिग्दर्शित करणार आहेत, ज्यांनी नुकताच एमएक्स प्लेसरवर प्रदर्शित झालेला ‘इंदोरी इश्क’ दिग्दर्शित केला आहे.

स्वीटीच्या आयुष्याने एक पटकथा दिली!

सुमारे एक-दोन वर्षांपूर्वी संजय गुप्ता यांनी स्वीटीच्या बयोपिकचे हक्क विकत घेतले होते आणि तेव्हापासून ते या प्रोजेक्टवर काम करत आहेत. चित्रपट सध्या कास्ट केला जात आहे आणि 2022 च्या पूर्वार्धात मुंबई आणि आसपास याचे चित्रीकरण केले जाईल. माध्यमांनी देखी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संजय आणि समित यांच्याशी संपर्क साधला. संजय गुप्ता यांनी या बातमीला दुजोरा देताना सांगितले की, ‘स्वीटीच्या आयुष्याने आम्हाला एक उत्कृष्ट पटकथा दिली आहे. आम्हाला विश्वास आहे की, ती कथा एका मनोरंजक चित्रपटात अनुवादित होईल. आम्ही आता इतर तपशील तयार करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहोत.’

डान्सबार विश्वाचा खोलवर अभ्यास!

समित यांनी देखील यावर बोलताना म्हटले की, ‘संजय आणि माझ्यासाठी हा एक पॅशन प्रोजेक्ट आहे. मी स्वीटीची प्रसिद्धी आणि फॅन्डम प्रथमच अनुभवले आहे. अनेक वर्षांपूर्वी, जेव्हा प्रेक्षक हुल्लडबाजी करत नव्हते आणि हे डान्सर आपले काम करत होते, तेव्हा त्यांचे काय होते हे समजून घेण्याच्या प्रयत्नात मी स्वतःला गुंतवले आहे. स्वीटीच्या माध्यमातून आम्ही या शहरातील डान्सबार जगताचा खूप खोलवर अभ्यास केला आहे आणि आता मी चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करू शकत नाहीय.’

हेही वाचा :

बॉलिवूडची चर्चित नावं, तरी मृत्यूने गाठलं अन् कुणाला कळलंच नाही! ब्रह्माच नाही तर ‘या’ कलाकारांचा शेवटही वेदनादायी!

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लगीन घटीका समीप आली! अंकिता-विकीच्या लग्न सोहळ्याला सुरुवात!

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.