AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात माजी आमदार नरेंद्र पवार यांना न्यायालयाचा मोठा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मोठी बातमी समोर येत आहे.  भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना मोठा धक्का बसला आहे.  न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात माजी आमदार नरेंद्र पवार यांना न्यायालयाचा मोठा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
माजी आमदाराला न्यायालयाचा दणका Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 6:59 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे.  भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना मोठा धक्का बसला आहे.  न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.  भिवंडीतील बापगाव फार्महाऊस सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  22 वर्षीय महिलेने केलेल्या कथित सामूहिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान या प्रकरणात भिवंडी न्यायालयात मागील सुनावणीत पीडित महिलेनं आणि पोलिसांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली होती. गुन्ह्यात वापरलेली गाडी,फार्महाऊसमधील CCTV आणि DVR गायब असून, ते हस्तगत करण्यासाठी आरोपींची कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद यावेळी पोलिसांनी न्यायालयात केला होता. पोलीस आणि पीडिता यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आज भिवंडी न्यायालयाने नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे आता माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

आरोपी फरार 

दरम्यान भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात भिवंडी न्यायालयाने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे आता माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोप सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी आता विविध पथक तयार केले असून, या पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली गाडी,फार्महाऊसमधील CCTV आणि DVR गायब  असल्याचा दावा पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालयाने पोलीस आणि पीडितेची बाजू ऐकून घेतल्यानंतर नरेंद्र पवार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...