ठाणेकरांनो सावधान ! एका वर्षात भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 27 लाखांवर?

ठाणे मनपा क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल दीड लाखांवर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाणेकरांनो सावधान ! एका वर्षात भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 27 लाखांवर?


ठाणे : ठाणे मनपा क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल दीड लाखांवर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील वर्षभरापासून ठाणे महापालिकेकडे निधीच नसल्याने या कुत्र्यांचे निर्बिजीकरण रखडले आहे. परिणामी शहरात कुत्र्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्यांची संख्या एवढ्या वाढल्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. तसेच, या कुत्र्यांकडून दिवसाला तब्बल 80 ते 100 जणांचा चावा घेतला जात असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, ही स्थिती अशीच राहिली, तर एका वर्षात भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 27 लाख होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. (the Dogs population has increased in Thane)

कोरोना महामारीमुळे महापालिकेचे दुर्लक्ष

मार्च महिन्यापासून करोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी किंवा तत्सम इतर गोष्टींवर ठाणे पालिकेने लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले. यावर बोलताना “शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुचाकी-चारचाकीच्या मागे लागणे, अंगावर धावून येणे, झुंडीने हल्ला करणे, लहान मुलांचा चावा घेणे, अशा घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे.” असे मत ठाणेकरांकडून व्यक्त केले जात आहे.

दररोज अंदाजे शंभर जणांचा चावा

शहरात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांचे निर्बिजीकरण न झाल्याने त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ठाण्यात दिवसाला तब्बल 80 ते 100 जणांचा चावा या भटक्या कुत्र्यांकडून घेतला जात आहे. यावर बोलताना भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याचे श्वान तज्ज्ञ सत्यजित शहा यांनी सांगितले. “श्वान दंशाच्या ज्या काही घटना होतात, त्यातील 80 टक्के घटनांमध्ये 3 ते 8 या वयोगटातील मुलांचा चावा या कुत्र्यांकडून घेतला जातो. ठाणे शहरात अंदाजे दीड लाख भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रोज अंदाजे 80 ते 100 व्यक्तींचा चावा या कुत्र्यांकडून घेतला जातो,” असे शहा यांनी सांगितले.

वर्ष 2021 पर्यंत ठाण्यात 27 लाख कुत्रे

तसेच, “पालिका म्हणते आम्ही निर्बिजीकरण करतो. मात्र, कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असेल्याचे आकडेवारी स्पष्ट झाले आहे. याच आकडेवारीवरुन वर्ष 2021 मध्ये ठाणे मनपा हद्दीत कुत्र्यांची संख्या 27 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे,” असे शाहा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

ठाणेकरांना 10 एमएलडी मिळणाऱ्या वाढीव पाण्यावरून वाद, शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन दिवशी शहरातील पाणीपुरवठा बंद

मनसेच्या भव्य मोर्चावर ठाणे पोलिसांकडून ब्रेक, जिल्हाबंदीच्या आदेशामुळे गोंधळ

(the Dogs population has increased in Thane)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI