AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांवर मोठी पाणी कपाती, अनेक गोष्टींवर निर्बंध ?, पाहा कशावर येणार बंधने…

यंदा पावसाने ओढ दिल्याने पुणे शहरात धरणातील पाणी कमी झाल्याने पुणे महानगर पालिकेने येत्या सोमवार पासून मोठी पाणी कपात जाहीर केली आहे.

पुणेकरांवर मोठी पाणी कपाती, अनेक गोष्टींवर निर्बंध ?, पाहा कशावर येणार बंधने...
Water cut in pune city
| Updated on: Jun 09, 2026 | 5:53 PM
Share

पावसाने ओढ दिल्याने पुण्यावर मोठ्या पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याने निच्चांक गाठल्याने मोठ्या पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. पुणे शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. पुणेकरांवर अनेक ठिकाणी पाणी बचत करावी लागणार आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अनेक गोष्टींवर पाण्याच्या सढळ हस्ते वापर करताना आढळ्यास कारवाई देखील होणार आहे.

यंदा पाऊस १५ जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात येईल असा अंदाज असताना आता मुंबईला लागून असलेल्या महानगर पुण्यातही धरणे कोरडीठाक पडत चालली आहेत. त्यामुळे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पाणी कपात जाहीर केली आहे. पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाण्याची अपव्यय टाळण्यासाठी पुणेकरांच्या अनेक गोष्ठींवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

पुणे शहरालाखडकवासला धरण समूहातून पाणीपुरवठा होत असतो.यंदा पावसाला उशीर लागण्याने आणि उष्णता जास्त असल्याने धरणातील पाणी कमी झाले आहे. पुण्याच्या खडकवासला धरणात ५ अब्ज घनफूट ( टीएमसी ) पाणी साठा शिल्लक आहे. पुणे शहरासाठी दरमहा सुमारे १.६ टीएमसी पाण्याचा वापर केल जात असतो.

सध्याची परिस्थिती पाहाता खडसवासला धरण समुहातील पाणी पुरवठा सुरु ठेवणे आता कठीण झाले आहे. धरणातील हाच घटलेला पाणीसाठा पाहता पुणे शहरासाठी महापालिकेने पाणी कपातीचे पाऊल उचलले आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की पाणी जपून वापरण्यात यावे पाणीची नासाडी करु नयेत. घरात पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा असे आवाहन पुणे महानगर पालिकेने केलेले आङे.

कार वॉशिंग सेंटर्स आणि स्विमिंग पूलवर निर्बंध?

पुणे शहरातील गंभीर पाणी टंचाई पाहाता आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहे. व्यावसायिक कारणासाठी होणारा पाण्याचा वापर कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील कार वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल आणि बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर कठोर निर्बंध घालण्याचा विचार पुणे महानगर पालिका करत आहे. नागरिकांना पूर्वतयारी करता यावी, यासाठी प्रशासनाकडून तयारीसाठी एका आठवड्याचा कालावधी दिला आहे.

केव्हापासून अंमलबजावणी?

सध्या तांत्रिक कारणांमुळे शहर आणि उपनगरात अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून पुढील आठवड्यापासून या एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय पूर्णपणे प्रत्यक्षात अंमलात आणला जाईल. पाणी नियोजनाबाबत जलसंपदा विभागाशी देखील या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाणार असून त्यानंतरच अंतिम आराखडा स्पष्ट होईल. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अपव्यय पूर्णपणे थांबवावा, असे पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटले आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी