AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषदेच्या निवडणुकीचं चित्र अखेर स्पष्ट, कोण कोणाविरोधात लढणार? कुठे बंडखोरी?

राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत. आज या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता निवडणुकांच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचं चित्र अखेर स्पष्ट, कोण कोणाविरोधात लढणार? कुठे बंडखोरी?
Legislative Council ElectionImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 4:41 PM
Share

संदीप जाधव, प्रतिनिधी : विधान परिषदेच्या पाच जांगासाठी निवडणुका होणार आहेत. यामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ या जागांचा समावेश आहे. दरम्यान आज या पाचही जांगासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ज्या -ज्या मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली होती, त्यातील काही जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, तर काही ठिकाणी बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

पुणे शिक्षक मतदार संघ – पुणे शिक्षक मतदार संघात भाजपचे कौस्तुभ गावडे विरूद्ध काँग्रेसचे जयंत आसगावकर अशी प्रमुख लढत रंगणार आहे. मात्र दुसरीकडे सचिन सानप यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधर मतदार संघ – पुण्याच्या पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्यामध्ये लढत असणार आहे. मात्र दुसरीकडे माजी आमदार दत्ता सावंत यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.

नागपूर पदवीधर मतदार संघ- नागपूरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे विरूद्ध काँग्रेसचे अभिजीत वंजारी असा सामना रंगणार आहे.  परंतु या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नितेश कराळे देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.

अमरावती शिक्षक मतदार संघ – अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार  अदिती पोहरे, विरूद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून याच मतदारसंघामधून दत्तात्रय लहाने हे निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहयला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातून माजी आमदार श्रीकांत शिंदे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे असलेल्या शेखर भोयर यांनी देखील बंडखोरी केली आहे.

तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलिप घुगे असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रतापसिंह पाटील देखील ही निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

Follow Us
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र