AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC, HSC Result 2022 : बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होणार

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी आणि 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. यावेळी बारावीची परीक्षा 15 दिवस उशिरा सुरु झाली होती. त्यामुळे बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत जाहीर होईल असे बोर्डाने म्हटले आहे.

SSC, HSC Result 2022 : बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होणार
ssc and hsc examImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 08, 2022 | 1:38 PM
Share

12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्ड पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले असून आता परिक्षेचा निकाल (Result) जाहीर करण्याचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बारावी (HSC)चा निकाल 10 जूनपर्यंत तर दहावी (SSC)चा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु होऊन 4 एप्रिल 2022 रोजी संपन्न झाल्या होत्या. दहावी, बारावीचे निकाल वेळेवर लागतील असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.

बारावीच्या निकालाच्या दहा दिवसांनंतर दहावीचा निकाल

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी आणि 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. यावेळी बारावीची परीक्षा 15 दिवस उशिरा सुरु झाली होती. त्यामुळे बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत जाहीर होईल असे बोर्डाने म्हटले आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घातल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचे बोर्डाने सांगितल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....