मोठी बातमी! आता भाजप -शिवसेना आमने-सामने, शिंदे गटाची महत्त्वाची बैठक, मुंबईत घडामोडींना वेग
मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीचं सरकार आहे. मात्र आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबई बँक निवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. मुंबई बँक निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमने-सामने येणार आहेत. मुंबई बँक निवडणुकी संदर्भात शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. बाळासाहेब भवन येथे ही बैठक पार पडली आहे. 2026 च्या शेवटी किंवा 2027 च्या सुरुवातीला मुंबई बँकेची निवडणूक होणार आहे. सध्या मुंबई बँकेत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून भाजपचं वर्चस्व आहे. मात्र आता दुसरीकडे शिवसेना शिंदे गट देखील या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. याच संदर्भात सोमवारी बाळासाहेब भवन येथे शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे पुण्यात देखील अशीच परिस्थिती पहायला मिळण्याची शक्यता आहे. पंढरपूरमध्ये बोलताना भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं विधान केलं आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, परंतु गरज पडल्यास आम्ही भाजप म्हणून ही निवडणूक लढवू असं त्यांनी म्हटलं आहे. परंतु या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे घेतील असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुण्यात देखील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकीकडे मुंबई बँक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. यावेळी शिवसेना शिंदे गट देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये बोलत असताना मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं विधान केलं आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, परंतु गरज पडल्यास आम्ही भाजप म्हणून ही निवडणूक लढवू असं त्यांनी म्हटलं आहे, त्यामुळे पुण्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
