राहुल शेवाळे यांचे अनेक व्हिडीओ, तेही व्हायरल व्हावेत; वर्षा गायकवाड यांची मोठी मागणी

राज्यात आणि देशात दबाव तंत्र वापरलं जात आहे. सरकारं तोडली जात आहेत. देशात वेगळं वातावरण केलं जात आहे. हुकूमशाहीचं वातावरण केलं जात आहे. राज्याच्या राजकारणाला काळीमा फासण्याचं काम सुरू आहे. राज्याच्या राजकारण गलिच्छ सुरू आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून असलं राजकारण हाणून पाडायला पाहिजे, असं मत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं.

राहुल शेवाळे यांचे अनेक व्हिडीओ, तेही व्हायरल व्हावेत; वर्षा गायकवाड यांची मोठी मागणी
varsha gaikwadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 5:46 PM

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी थेट राहुल शेवाळे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला वाटतं राहुल शेवाळेंचे मोठे व्हिडीओ आहेत. तेही बाहेर आले पाहिजे. शेवाळे चेंबूरला बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला गेले होते. तेव्हा लोकांनी काय केलं? ते व्हिडीओ बाहेर आले पाहिजे. त्यांचे दुबईतील व्हिडीओ फारच प्रसिद्ध आहेत. तेही बाहेर आले पाहिजे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

वर्षा गायकवाड मीडियाशी संवाद साधत होत्या. काँग्रेस दलित विरोधी आहे म्हणूनच कट कारस्थान करून वर्षा गायकवाड यांचं तिकीट कापलं, असा दावा शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी केला होता. त्यावरही वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत शांत होते. त्यांचा आता बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. आता ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला त्यांनी सल्ले द्यावेत. त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी, असा सल्ला वर्षा गायकवाड यांनी दिला.

मला अध्यक्षव केलं असतं का?

मिलिंद देवरा यांचं ट्विट काँग्रेसबद्दल नाहीये. काँग्रेस दलित विरोधी असता तर त्यांनी मला अध्यक्ष केलं असतं का? एका महिलेला मुंबईची अध्यक्षा केलं असतं का? आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षावर बोलू नये. त्यांच्या पक्षावर बोलावं. मुंबईतील तुमचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत, ते पाहा. एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर राहणार की नाही ते पाहावं. त्यांनी त्याचा विचार करावा, असा टोलाही वर्षा गायकवाड यांनी लगावला.

तेव्हा का नाही बोलले?

मिलिंद देवरा आता जे बोलत आहेत, ते काँग्रेसमध्ये असताना का बोलले नाही? कोणत्याही आघाड्या मुद्द्यावर होतात. आमची आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर झाली आहे. मिलिंद देवरा यांनी आता मोदींनी काय काम केलं ते सांगावं? या सरकारच्या कामावर बोलावं. 50 खोक्यावर बोलावं. महापालिकेतील निधीचं वाटप कसं केलं ते सांगावं. मुंबईसाठी केंद्र सरकारने काय दिलं ते सांगावं. महापालिकेचा 1 लाख कोटीचा निधी कुठे गेला? यावर उत्तर द्यावं. मुंबईचे इव्हेंट बाहेर नेण्याचं काम केलं, त्यावर बोलावं, असा हल्लाच त्यांनी चढवला. महागाई बेरोजगारीचं काय झालं? त्यांनी मुलभूत विषयावर बोलावं ना? इकडच्या तिकडच्या प्रश्नावर बोलण्याची भाजपची सवयच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?.
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं.
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल.
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?.
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं...
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं....
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन.
अरे तुझ्या घरच्या लाट ना पोळ्या पहिल्यांदा... अडसूळांचा राणांवर निशाणा
अरे तुझ्या घरच्या लाट ना पोळ्या पहिल्यांदा... अडसूळांचा राणांवर निशाणा.
शांतिगिरी महाराज भाजपात जाणार? मोदींचा करणार प्रचार; म्हणाले मोदी माझे
शांतिगिरी महाराज भाजपात जाणार? मोदींचा करणार प्रचार; म्हणाले मोदी माझे.
12 वी पासच्या पार्टीनं केला घात, दारूच नाहीतर ड्रग्सचीही नशा?
12 वी पासच्या पार्टीनं केला घात, दारूच नाहीतर ड्रग्सचीही नशा?.
अधिकृत गद्दारीचा पुरावा का? विशाल पाटलांच्या फोटोने चर्चा ठाकरे आक्रमक
अधिकृत गद्दारीचा पुरावा का? विशाल पाटलांच्या फोटोने चर्चा ठाकरे आक्रमक.