फडणवीसांनी शब्द दिलेला, 2019 आदित्यला मुख्यमंत्री बनवून …; उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Commitment about Aditya Thackeray in 2019 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा... देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला आपल्याला शब्द दिला होता, असं उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. वाचा...

फडणवीसांनी शब्द दिलेला, 2019 आदित्यला मुख्यमंत्री बनवून ...; उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 5:41 PM

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या विरोधी पक्ष असणाऱ्या परंतू, जुना मित्र पक्ष असणाऱ्या भाजपबाबत मोठा दावा केला आहे. 2019 ला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता, असं उद्धव ठाकरे एका मुलाखतीत म्हणालेत. 2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीला जाईल, असा शब्द देवेंद फडणवीस यांनी मला दिला होता, असं दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची एका वृत्तपत्रात मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. यात त्यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेना आणि भाजप अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेतील, असं अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत ठरलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की आदित्यला मुख्यमंत्री बनवून स्वत: दिल्लीत जातील म्हणून पण त्यांनी माझ्याच माणसांसमोर मला खोटं पाडलं, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

आम्ही हिंदुत्व आणि देश या दोन मुद्द्यांवर भाजपसोबत होतो. मग त्यांनी आमच्यासोबत असं का केलं? 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आम्हालाही आमचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं होतं. पण अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची चाल बदलली, असं उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणालेत.

अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचा दाखला

तुम्ही सर्व्हे केला आहे का? असं अमित शाह यांनी 2014 ला आम्हाला विचारलं. मी म्हणालो, आम्ही लढणारे आहोत. सर्वेक्षणाची गरज नाही. सर्वेक्षणात पराभव होताना दिसल्यास तुम्ही लढवणं सोडणार का?, असं मी त्यांना म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

आधी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासोबत वाटाघाटी व्हायच्या तेव्हाही रस्सीखेच व्हायची. नंतर भाजपचे लोक अहंकाराचे आकडे दाखवू लागले. बाळासाहेब गेल्यामुळे आता हल्ला करता येईल, असा त्यांचं म्हणणं होतं. तेच त्यांनी 2019 ला माझ्यासोबत केलं, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.