
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि व्हिडीओ पोलिसांना मिळाल्याची माहिती त्यांनी कोर्टात दिली. प्रांजल खेवलकर यांच्यासाठी पत्नी रोहिणी खडसे आणि सासरे एकनाख खडसे हे मैदानात उतरले. यादरम्यान खडसेंनी पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केली आणि कोर्टात जाणार असल्याचे थेट म्हटले.
काल या रेव्ह पार्टीबद्दल पुणे कोर्टात सुनावणी झाली आणि प्रांजल खेवलकरांसह इतर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. यामुळे यांचा जामिनाचा मार्ग मोकळा आहे. आता नुकताच या प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट आलीये. प्रांजल खेवलकरांचे वकील आज कोर्टात खेवलकरांच्या जामिनासाठी अर्ज करणार आहेत. सध्या प्रांजल खेवलकरांचा मुक्काम हा येरवडा जेलमध्ये आहे.
प्रांजल खेवलकरांना आज जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रांजल खेवलकर यांनी या पार्टीतील दुसऱ्या आरोपीला मुलीचे व्हिडीओ पाठवत म्हटले होते की, असा माल हवा आहे. यासोबतच खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काही धक्कादायक व्हिडीओ देखील पोलिसांना तपासात मिळाली आहेत. पोलिसांनी ही माहिती कोर्टात दिलीये. धक्कादायक म्हणजे ज्या पार्टीतून प्रांजल खेवलकरला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या पार्टीत काही महिला देखील उपस्थित होत्या.
प्रांजल खेवलकर याने कोर्ट परिसरात बोलताना पत्नी रोहिणी खडसेला त्या मुलींशी माझा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते. हेच नाही तर पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी तब्बल 24 तासांपेक्षाही जास्त वेळानंतर एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत सत्य बाहेर येईल, असे म्हणताना दोघांचा एक फोटो शेअर केला होता. माझ्या जावयाला फसवण्यात आल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. आता बाहेर आल्यानंतर प्रांजल खेवलकर काय बोलणार हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.