AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरपुड्यावरून एवढी टिका झाली, मग मुलीच्या लग्नात पैशांची एवढी उधळपट्टी का? इंदोरीकर महाराजांचं एका वाक्यात उत्तर

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाहसोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. मात्र या लग्नामुळे इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खर्चावरून पुन्हा एकदा त्यांना ट्रोल केलं जात आहे.

साखरपुड्यावरून एवढी टिका झाली, मग मुलीच्या लग्नात पैशांची एवढी उधळपट्टी का? इंदोरीकर महाराजांचं एका वाक्यात उत्तर
indurikar maharajImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 04, 2026 | 9:54 PM
Share

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाहसोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे या विवाहासोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 100 एकर जागेवर या लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या विवाहसोहळ्यासाठी इंदोरीकर महराज यांनी प्रचंड पैसा खर्च केला. दरम्यान त्यावरून पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. महाराज आपल्या किर्तनामध्ये नेहमी लग्न साधेपणाने करा, कर्ज काढू नका, जास्त पैसा खर्च करून नका असा सल्ला  देतात मग त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात एवढा खर्च का केला? असा सवालही अनेकांकडून उपस्थित करण्यात आला. दरम्यान त्यानंतर आपल्या मुलीच्या लग्नात मनोगत व्यक्त करताना इंदोरीकर महाराज यांनी आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले इंदोरीकर महाराज? 

साखरपुड्याची चर्चा महिनाभर सुरू होती, आता लग्नाची चर्चा वर्षभर सुरू राहील. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने तो खर्च करावा. मी माझ्या मुलीच्या लग्नात पैसा खर्च केला. यातील 90 टक्के पैसा हा मला भाविकांकडून मिळाला आहे, त्यामुळे कोणालाही यावर टीका करण्याचा अधिकार नाहीये. मी एकही पैसा न घेता सरकारी मदत न घेता विद्यालय चालवतो. 13 शिक्षक आहेत. असं यावेळी इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुलीच्या साखरपुड्यावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आपल्या एका किर्तनात इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं होतं, साखरपुड्यावरून टीका झाली, आता मुलीचं लग्न याहीपेक्षा जोरात करणार आणि महाराजांनी आपला शब्द खरा केलं असंही बोललं जात आहे.

साखर पुड्यावरून जोरदार टीका 

दरम्यान इंदोरीकर महाराज यांनी आपली मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा देखील मोठ्या थाटात केला होता. इंदोरीकर महाराज यांनी साखर पुड्यावर केलेल्या खर्चावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती, त्यावेळी इंदोरीकर महाराज चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान इंदोरीकर महाराज आता पुन्हा एकदा आपल्या मुलीच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी