AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे असतील हे 4 आव्हान

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वात आता राज्याला पुढे नेण्याचं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता त्यांनी निवडणुकीआधी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचं आव्हान देखील त्यांच्या पुढे असणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे असतील हे 4 आव्हान
| Updated on: Dec 05, 2024 | 6:03 PM
Share

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळाल्याने फडणवीस यांच्या नेतृत्वावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. राज्यात भाजपच्या वतीने जास्तीत जास्त आंदोलन करणारे आणि आपल्या रणनीतीमुळे भाजपला मोठे यश मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत आहेत. पण महाराष्ट्रातील सरकार चालवणे हे मोठे आव्हान असते. भाजपच्या नेतृत्वात महायुतीने या निवडणुकीत जनतेला मोठे आश्वासनं दिली होती. त्यामुळे लोकांच्या अपेक्षांचा डोंगर खूप मोठा झाला आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांना देखील सोबत घेऊन चालावे लागणार आहे. मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांना काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

1-लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणे

विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. ज्याला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सरकारने जर पुन्हा महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरुन २१०० करण्याचे आश्वासने दिले होते. आता हे आश्वासन पूर्ण करण्याचे पहिले प्राधान्य हे असेल जेणेकरून आर्थिक स्थिती स्थिर होईल. याशिवास सरकारने किसान सन्मान निधीची रक्कम 12 हजारांवरून 15 हजार करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वृद्धापकाळ निवृत्ती वेतनात वाढ करण्याचं आश्वासन देखील सरकारने दिले होते. राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे मोठे आव्हान असणार आहे. राज्यावर ७.८२ लाख कोटीचे कर्ज आहे. ते देखील कमी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. महसुली वाढ जशी होती तशीच आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांना पगार देणे कठीण होऊ शकते. असे तज्ज्ञांचे मत आहे.

2- मुंबई महापालिका निवडणूक

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यांचं मोठं आव्हान देखील देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे असेल. मुंबई महापालिका जिंकणे हे कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याइतकेच महत्त्वाचे मानले जाते. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत त्यांना मुख्यमंत्री ठेवण्याची मागणी केली होती. पण भाजपला ते मान्य नव्हते. यामुळे चुकीचा मेसेज जाईल असं भाजपने सांगितले. बीएमसीवर ३० वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर भाजपला मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा पराभव करण्याचं आव्हान महायुतीपुढे असेल. सरकारवर आपली पकड मजबूत करण्यासाठी फडणवीसांना कोणत्याही परिस्थिती मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकावी लागेल.

3-महायुतीत सत्तेचं वाटप

भाजपने ही निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत लढवली आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष मिळून राज्यात सत्ता स्थापन झालीय. त्यामुळे तिन्ही पक्षांना सोबत घेऊन काम करण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे असणार आहे. राजकीय सहकाऱ्यांशी चर्चा करुन सगळे निर्णय घ्यावे लागणार आहेत. महायुतीत भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याने मुख्यमंत्रीपदी भाजपचा मुख्यमंत्री निवडण्यात आला. पण इतर दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन राज्याचा गाडा चालवावा लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

4- महाराष्ट्राला नंबर १ ठेवणे

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आल्यानंतर आता सर्वात मोठं आव्हान असेल ते महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योग आणावे आणि जे आहेत त्यांना इतर राज्यात जाण्यापासून रोखणे. कारण महायुती सरकारवर उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप होता. महाराष्ट्राचे दोन मोठे प्रकल्प गुजरातला गेले होते. वेदांतने आपला चिप कारखाना प्रकल्प जो १.५३ लाख कोटी रुपयांचा आहे, तो गुजरातला नेला होता. तर टाटा-एअरबस सी-२९५ वाहतूक विमान प्रकल्पही गुजरातला गेल्याने महाराष्ट्र सरकारवर टीका झाली होती. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना गुंतवणुकीत राज्याला नंबर एक ठेवण्याचं आव्हान असेल.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.