Nashik| साहित्य संमेलनात उद्या होणार हे कार्यक्रम, जाणून घ्या वेळ आणि मान्यवर…!

नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

Nashik| साहित्य संमेलनात उद्या होणार हे कार्यक्रम, जाणून घ्या वेळ आणि मान्यवर...!
नाशिकमधील कुसुमाग्रजनगरीमध्ये उद्या साहित्य संमेलन सुरू होत आहे.

नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. दुपारी साडेचार वाजता संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर (Jayant Narlikar), मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), प्रमुख पाहुणे गीतकार जावेद अख्तर आणि उद्घाटक साहित्यिक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथदिंडी निघणार आहे.

सकाळी ग्रंथदिंडी निघणार

नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनहोत आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आहेत. उद्या शुक्रवारी 03 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ग्रंथदिंडी निघेल. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँडपर्यंत पायी जावून तेथून वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत जाईल. तेथून परत दिंडी पायी संमेलन स्थळापर्यंत जाईल.

ध्वजारोहण

संमेलनस्थळी सकाळी 11.00 वा. ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. दुपारी 4.00 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, 93 व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनोगत आणि नवीन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण होईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल.

निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन

रात्री 9 वा. निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होईल. कवी श्रीधर नांदेडकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून सूत्रसंचलन संजय चौधरी हे करणार आहेत. या काव्य संमेलनासाठी सर्वश्री कवी दगडू लोमटे, सय्यद अल्लाउद्दीन, रवी कोरडे, प्रिया धारुरकर, मनोज बोरगावकर, वैजनाथ अनमूलवाड, भाग्यश्री केसकर, नंदकुमार बालुरे, वाल्मिकी वाघमारे, इरान शेख, किशोर बळी, दिनकर वानखेडे, अनिल जाधव, विजय शंकर ढाले, तीर्थराज कापगते, मनोज सुरेंद पाठक, विष्णु सोळंके, गजानन मानकर, मिनाक्षी पाटील, संजय कृष्णाजी पाटील, रामदास खरे, प्रविण बोकुलकर, गीतेश शिंदे, मनोज वराडे, वैभव साटम, गौरी कुलकर्णी, संगिता धायगुडे, विलास गावडे, अमोल शिंदे, अजय कांडर, विनायक कुलकर्णी, अविनाश चव्हाण, संजीवकुमार सोनवणे, विजय जोशी, अंजली बर्वे, प्रशांत केंदळे, दयासागर बन्ने, साहेबराव ठाणगे, प्रकाश होळकर, उत्तम कोळगावकर, संदीप जगताप, मिलींद गांधी, रेखा भांडारे, विष्णू भगवान थोरे, कमलाकर देसले, राजेंद्र केवळबाई दिघे, सुषमा ठाकूर, किरण काशिनाथ, दीपा मिरिंगकर, नीता शहा, प्रा. लक्ष्मण महाडिक, काशिनाथ वेलदोडे, डॉ. माधवी गोरे मुठाळ, सुशिला संकलेचा आदी कवींना निमंत्रित केलेले आहे. शिवाय या कविसंमेलनासाठी भोपाळ, गोवा आणि गुजरात या राज्यातील कवीही निमंत्रित आहेत.

इतर बातम्याः

Nashik| साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण, भुजबळांची माहिती; सभामंडपासह भोजन व्यवस्थेच्या कामाची पाहणी

Nashik| जीवघेण्या थंडीने गारठून 16 जनावरांचा मृत्यू; सैरभर शेतकऱ्याचा रानातच टाहो!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI