हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका, राम शिंदे यांचं टीकास्त्र

हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका, राम शिंदे यांचं टीकास्त्र

हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे", अशी टीका राम शिंदे यांनी केली. Ram Shinde attacks on Thackeray Sarkar

सचिन पाटील

|

Aug 01, 2020 | 11:49 AM

अहमदनगर : “हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे”, अशी खरमरीत टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. (Ram Shinde attacks on Thackeray Sarkar)

“आजचं आंदोलन महाराष्ट्रातील तिगडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून कुठलाही निर्णय घेतला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे सरकारचे कान उघडण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत” असं राम शिंदे म्हणाले. (Ram Shinde attacks on Thackeray Sarkar)

“हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे, प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होतं. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही” असा आरोप राम शिंदे यांनी केला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्याचं हातवर पोट आहे, त्याला कुठलीही मदत राज्य सरकारने केली नाही, फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे, असंही टीकास्त्र राम शिंदे यांनी सोडलं.

संबंधित बातम्या 

Milk Agitation LIVE: वेळ गेलेली नाही, तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा राज्यकर्त्यांच्या दारात आंदोलन : अजित नवले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें