
महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. त्यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत. राज्यात एवढा प्रचंड पाऊस झाली की, अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं. अनेक गावांचा सर्पक तुटला होता. पावसामुळे अनेकांचे घरं पडले, तर काहींच्या घरात पाणी घुसून मोठं नुकसान झालं. दरम्यान आज या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी पॅकेजी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी 31 हजार 628 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. सोबतच अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत.
सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांची घर संपूर्णपणे पडली आहेत, अशा नुकसानग्रस्तांना आता पीएम आवास योजनेतून नव्या घरासाठी मदत केली जाणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची घरं पूर्णपणे पडली नाहीत मात्र नुकसान झालं आहे, अशा शेतकऱ्यांना देखील आपलं घर तसेच जनावरांचे गोठे पुन्हा दुरुस्त करण्यासाठी देखील सरकार मदत करणार आहे, या निर्णयामुळे ज्यांनी पावसात आपलं घर गमावलं आहे, त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यासोबतच अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांची जमीन पावसामुळे खरडून गेली आहे, त्यांना प्रति हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे, त्यातील 47 हजार रुपये हे रोख मिळणार आहेत. तर उर्वरीत रक्कम ही मनरेगा मार्फत मिळणार आहे. तसेच पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचं नुकसान झालं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी तीस हजार रुपयांची विशेष मदत केली जाणार आहे, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली आहेत, किंवा मृत्यूमुखी पडली आहेत, त्यांना देखील मदतीची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. तर इन्फ्राक्ट्रक्चरसाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.